मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – सुमारे 52 कोटी रुपयांच्या कोकेनसह एका विदेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. या प्रवाशाकडून या अधिकार्यांनी 5194 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले असून चालू वर्षांत आंतरराष्ट्रीय जप्त करण्यात आलेला हा आतापर्यंत सर्वांत मोठा ड्रग्जचा साठा आहेत. आरोपी प्रवाशाविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत गोल्ड आणि ड्रग्जच्या तस्करीत लक्षणीय वाढ झाली होती, त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी विशेष मोहीम होती घेतली होती. ही कारवाई सुरु असताना विदेशातून आलेल्या एका प्रवाशाला हवाई गुप्तचर विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यासह त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांनी चार बॉक्स सापडले. कमरेच्या पट्ट्यातून आणि कालतमधून या अधिकार्यांनी पांढर्या रंगाची पावडर जप्त केली होती. नारकोर्टीस फिल्ड टेस्टींग किट वापरुन जप्त केलेल्या पदार्थाची तपासणी केल्यानंतर ती पावडर कोकेन असल्याचे उघडकीस आले.
या चारही बॉक्समधून या अधिकार्यांनी 5 किलो 194 ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 52 कोटी रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याला ते कोकेन कोणी दिले, तो कोकेन कोणाला देणार होता, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली होती का याचा तपास सुरु आहे. दरम्यान चालू वर्षांतील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी ड्रग्जची कारवाई असल्याचे बोलले जाते.