साडेआठ कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह दोघांना अटक

आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑगस्ट 2025
मुंबई, – बॅकाँकहून फूड पॅकेटच्या आड आणलेल्या हायड्रोपोनिक गांजासह दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. मोहम्मद स्वेल आणि समीर खान अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहे. या दोघांकडून या अधिकार्‍यांनी 8562 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत 8 कोटी 56 लाख 20 हजार रुपये इतकी आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या दोघांना रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही महिन्यांत बँकाँकहून हायड्रोपोनिक गांजा तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या तस्कराविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना गेल्या दहा दिवसांत अशाच प्रकारे तीन वेगवेगळ्या कारवाईत तीन प्रवाशांना अटक केली होती. या तिन्ही प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचा हायड्रोपोलिक गांजाचा साठा जप्त केला होता. ही कारवाई सुरु असताना शनिवारी बँकाँकहून येणार्‍या विमानातून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी बँकाँकहून येणार्‍या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या बँगेची तपासणी सुरु केली होती.

ही तपासणी सुरु असताना मोहम्मद स्वैल आणि सलीम खान या दोन तरुणांना या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या बॅगेची तपासणीदरम्यान या अधिकार्‍यांना त्यात सहा खाऊची पाकिट सापडले. फूड पॅकेटच्या आड या दोघांनी हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. सहाही पॅकेटमधून या अधिकार्‍यांनी 8 किलो 562 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे साडेआठ कोटी रुपये इतकी आहे. तपासात त्यांना हा साठा बॅकाँक येथून एका व्यक्तीने त्यांच्या मुंबईतील सहकार्‍या देण्यासाठी दिला होता. याकामी त्यांना विमानाची तिकिट आणि काही रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती.

मात्र हा साठा संबंधित व्यक्तीला देण्यापूर्वीच या दोघांनाही या अधिकार्‍यांनी गांजासह शिताफीने अटक केली. हा साठा ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासात ते दोघेही उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून काही दिवसांपूर्वी बँकाँकला गेले होते. बँकाँकहून मुंबईत येताना ते हायड्रोपोनिक गांजा घेऊन आले होते, मात्र त्यांचा गांजा तस्करीचा प्रयत्न सीमा शुल्क विभागाने हाणून पाडला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page