बँकॉकहून आणलेल्या हायड्रोपोनिक गांजासह दोघांना अटक
दोन्ही प्रवाशांकडून 13 कोटी 83 लाखांचा गांजा जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 सप्टेंबर 2025
मुंबई, – बँकाँकहून आणलेल्या हायड्रोपोनिक गांजासह दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमच्या हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. या दोन्ही प्रवाशांकडून या अधिकार्यांनी 13 किलो 830 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 13 कोटी 83 लाख रुपये इतकी आहेत. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांत बँकाँकहून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होत असल्याने अशा तस्कराविरोधात कस्टम अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे बँकाँकहून दोन प्रवाशी आले होते. या दोघांच्या सामानात हायड्रोपोनिक गांजा असल्याचे उघडकीस येताच विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडील ट्रॉली बॅगेची तपासणी केल्यानंतर एक प्रवाशाकडे दोन किलो तर दुसर्या प्रवाशाकडे 11 किलो 834 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा सापडला.
दोन्ही कारवाईत या अधिकार्यांनी 13 किलो 830 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत 13 कोटी 83 लाख रुपये इतकी आहे. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच या दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांत कस्टम अधिकार्यांनी बँकाँकहून आणलेला कोट्यवधी रुपयांचा गांजाचा जप्त केला असू याच गुन्ह्यांत काही प्रवाशांवर अटकेची कारवाई केल्याचे सांगण्यात आले.