9.81 कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह प्रवाशाला अटक

बँकाँकहून आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच अटकेची कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2026
मुंबई, – बँकाँकहून आणलेल्या 9 कोटी 82 लाख रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजासह एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. रवी राजपूत असे या प्रवाशाचे नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्या बँगेतून या अधिकार्‍यांनी दहा पॅकेटमधून 9819 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही वर्षांत बँकाँक येथू मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होत असल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी बँकाँकहून येणार्‍या प्रत्येक प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. ही कारवाई सुरु असताना शनिवारी रात्री उशिरा बँकाँकहून रवी राजपूत हा प्रवाशी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला हवाई गुप्तचर विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यासह त्याच्या सामानाची या अधिकार्‍यांनी झडती घेतली होती. त्यात या अधिकार्‍यांनी दहा पॅकेट सापडले. या पॅकेटमध्ये त्याने हायड्रोपोनिक गांजा आणल्याचे उघडकीस आले.

या दहाही पॅकेटमधून या अधिकार्‍यांनी 9819 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला. त्याची किंमत 9 कोटी 81 लाख 90 हजार रुपये इतकी आहे. हा साठा जप्त केल्यानंतर रवीविरुद्ध या अधिकार्‍यांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रवी राजपूत हा मध्यप्रदेशच्या सागर, सिंधी गुरुद्वारा, संत कनवररम वार्डचा रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वीच तो बँकाँकला गेला होता. तिथे त्याला एका व्यक्ती हायड्रोपोनिक गांजा मुंबईत डिलीव्हरीसाठी दिला होता. त्यासाठी त्याला विमानाचे तिकिट आणि काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. मात्र गांजा डिलीव्हरी करण्यापूर्वीच त्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page