बॅकाँकहून आणलेल्या ड्रग्जसहीत तीन प्रवाशांना अटक

8 कोटी 60 लाखांचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जून 2025
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी 52 कोटीचा कोकेनचा साठा जप्त करण्यात आल्याची कारवाई ताजी असताना सोमवारी बँकाँकहून आणलेल्या ड्रग्जसहीत तीन भारतीय प्रवाशांना दोन वेगवेगळ्या घटनेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अटक केली. या तिन्ही प्रवाशांकडून या अधिकार्‍यांनी 8 किलो 600 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 8 कोटी 60 लाख रुपये इतकी किंमत आहेत. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्यानंतर सीमा शुल्क विभागाने अशा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बँकाँकहून येणार्‍या विमानातून काही प्रवाशी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी प्रत्येक प्रवाशासह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. यावेळी विमानतळावर तीन प्रवाशांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्यासह त्यांच्या सामानाच झडती घेतल्यानंतर त्यात 8 किलो 600 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. त्याची किंमत 8.6 कोटी रुपये इतकी आहे.

एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच या तिघांवर अटकेची कारवाई करण्यता आली आहे. दोन दिवसांपूर्वीच हवाई गुप्तचर विभागाने एका विदेशी नागरिकाला अटक केली होती. त्याच्याकडून 5194 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले होते. त्याची किंमत 51 कोटी 94 लाख रुपये होती. चालू वर्षांत आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आलेला हा आतापर्यंत सर्वांत मोठा ड्रग्जचा साठा होता. ही कारवाई ताजी असताना सोमवारी तीन प्रवाशांकडून या अधिकार्‍यांनी 8 कोटी 60 कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. आगामी काळातही या अधिकार्‍यांची ड्रग्ज तस्कराविरुद्ध मोहीम सुरु राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page