आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुटातून गोल्ड तस्करीचा पर्दाफाश
बँकाँकहून आलेल्या प्रवाशांना सव्वासहा कोटीच्या गोल्डसह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 एपिल 2025
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुटातून गोल्ड तस्करीचा हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. बँकाँकहून आलेल्या दोन प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक करुन त्यांच्याकडून सव्वासहा कोटीचे गोल्ड जप्त केले आहेत. भरत चमनलाल शेठ आणि चिंतन विरेंद्र संघवी अशी या तिघांची नावे आहेत. 71 वर्षांचा भरत हा शिवडी तर 36 वर्षांचा चिंतन हा परळ परिसरात राहतो. या कारवाईत या अधिकार्यांनी 6 किलो 735 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहेत.
कधी घरगुती वस्तू तर कधी खाऊच्या पाकिटातून गोल्ड आणि ड्रग्ज तस्करीचे अनेक उदाहरण उघडकीस आले आहे. मात्र शुक्रवारी एका अपंग व्यक्तीने त्याच्या कुत्रिम बूटातून सोने आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. बँकाँकहून काही प्रवाशी कोट्यवधी रुपयांचे गोल्डची तस्करी करणार असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्यांनी बँकाँकहून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती.
शुक्रवारी भरत शेठ आणि चिंतन संघवी हे दोघेही बँकॉकहून आले होते. विमानतळाबाहेर जाण्याच्या तयारीत असताना या दोघांनाही या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या सामानाची तपासणी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुत्रिम बुटातून गोल्ड तस्करी केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या बुटातून या अधिकार्यांनी 6735 ग्रॅम वजनाचे गोल्ड जप्त केले असून त्याची किंमत 6 कोटी 30 लाख 40 हजार रुपये आहे. या दोघांनी बँकाँकहून ते गोल्ड आणले होते. मुंबईत एका व्यक्तीला ते गोल्ड देण्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन आणि विमानाचे तिकिट देण्यात आले होते. गोल्ड तस्करीसाठी आता तस्कर अपंग व्यक्तीचा कॅरिअर म्हणून वापर करु लागल्याचे या घटनेवरुन उघडकी आले.
या गुन्ह्यांत संबंधित व्यक्तीचे नाव समोर आल्यानंतर त्याला चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत त्याची लवकरच या अधिकार्यांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. दरम्यान गोल्ड तस्करीप्रकरणी भरत शेठ आणि चिंतन संघवी या दोघांना नंतर अटक करण्यात आली. अटकेनंतर या दोघांनाही शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.