गोल्ड तस्करीप्रकरणी सात प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक
नैरोबी-दुबईहून आणलेले साडेतीन कोटीचे गोल्ड जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 सप्टेंबर 2025
मुंबई, – गेल्या दोन दिवसांत गोल्ड तस्करीप्रकरणी सात प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अटक केली आहे. या प्रवाशांकडून नैरोबी आणि दुबईहून आणलेले सुमारे साडेतीन कोटीचे गोल्डचा साठा या अधिकार्यांनी जप्त केला आहे. या सर्वांनी गोल्ड परिधान केलेल्या कपड्यासह अंतवर्स्त्रातून लपवून आणल्याचे उघडकस आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून विदेशात मोठ्या प्रमाणात गोल्ड, ड्रग्जची तस्करी होत असल्याने अशा तस्कराविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असातना गेल्या दोन दिवसांत नैरोबी आणि दुबईहून आलेल्या सात प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोल्डचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या गोल्डची किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे. त्यापैकी पाच प्रवाशी नैरोबी तर दोन प्रवाशी दुबईहून आणले होते. ते सर्वजण तेथून गोल्ड घेऊन आले होते. यातील बहतांश प्रवाशांनी त्यांनी परिधान केलेल्या कपड्यातून ते गोल्ड लपवून आणले होते.
अन्य एका कारवाईत सीमा शुल्क विभागाने बँकाँकहून आलेल्या एका प्रवाशाला अटक केली. त्याच्याकडून या अधिकार्यांनी पांढर्या गालाचा गिबन दोन वन्यजीव जप्त केले होते. ते वन्यजीव त्याने एका ट्रॉली बॅगेत लपवून आले होते. विमानतळाबाहेर जाण्याच्या तयारीत असताना या प्रवाशाला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.