मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बँकॉकहून मेणातून लपवून आणलेल्या सोन्याच्या तस्करीचा हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका प्रवाशासह छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचार्याला या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी १८०० ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले असून त्याची किंमत १ कोटी ३६ लाख रुपये इतकी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांत विदेशातून सोने तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा सोने तस्करी करणार्या प्रवाशांविरुद्ध या अधिकार्यांनी विशेष मोहीम सुरु केली होती. ही मोहीम सुरु असताना बँकॉकहून काही प्रवाशी सोन्याची तस्करी करणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी एका कर्मचार्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो वॉशरुममधून बाहेर आल्यानंतर विमानतळाबाहेर जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्यापूर्वी त्याला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील बॅकपॅकची झडती घेतल्यानंतर त्यात मेणातून लपवून आणलेले २४ कॅरेटचे सोन्याची धूळ जप्त करण्यात आले. १८०० ग्रॅम वजनाच्या या सोन्याची किंमत १ कोटी ३६ लाख रुपये इतकी आहे. त्याने ते इनरवेअर आणि बॅकपॅकमध्ये लपवून आणले होते. बँकॉंकहून आलेल्या एका प्रवाशाने त्याला ते सोने दिले होते. ते सोने विमानतळाबाहेर आणून देण्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळणार होते, मात्र त्याच्या अटकेने सोने तस्करीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बँकॉंकहून आलेल्या या प्रवाशालाही या अधिकार्यांनी अटक केली. या दोघांविरुद्ध सोने तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत त्यांना या अधिकार्यांनी अटक केली.