बॅकाँकहून आणलेल्या वन्य प्राण्याच्या तस्करीचा पर्दाफाश
120 विदेशी जिवंत वन्य प्राण्यासह दोन प्रवाशांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 जून 2025
मुंबई, – बँकाँकहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणलेल्या वन्य प्राण्याचा तस्करीचा कस्टम अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन भारतीय प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत या अधिकार्यांनी 120 हून अधिक विदेशी जिवंत वन्य प्राणी ताब्यात घेतले आहे. दोन्ही प्रवाशांविरुद्ध वन्य प्राण्याची तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
गेल्या काही वर्षांत विदेशातून ड्रग्ज आणि गोल्ड तस्करीचे प्रमाण वाढल्यानंतर कस्टम अधिकारी अधिक सतर्क झाले होते. बुधवारी बँकाँकहून दोन प्रवाशी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या सामानाची झडतीदरम्यान एक बॅग सापडली. त्यात एक बॉक्स होता. या बॅगेतून या अधिकार्यांनी बॅसिलिस्क, सरडे, इगुआना, सुमात्र पट्टेदार ससे आणि कुस्कससह 120 जिवंत वन्य प्राणी सापडले. वन्य प्राण्याची तस्करी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना अटक करण्यात आले. जप्त केलेले वन्य प्राणी सीमा शुल्क आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाने ताब्यात घेतले असून त्यांना पुन्हा बँकाँक येथे पाठविण्यात येणार आहे. या दोन्ही प्रवाशांची कस्टम अधिकार्यांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी यापूर्वीही वन्य प्राण्याची तस्करी केली आहे का, त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा तपास सुरु आहे.