मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2025
मुंबई, – जेद्दाहहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. या प्रवाशाने इस्त्रीमधून सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस आले असून त्याच्याकडून बाराशे ग्रॅम वजनाचे सोळा सोन्याचे पीस जप्त केले आहेत. त्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये सांगण्यात आले. सोने तस्करीप्रकरणी या प्रवाशाला अटक करुन नंतर लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
विदेशातून होणार्या सोने आणि ड्रग्ज तस्करीनंतर आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित अधिकार्यांनी अशा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना शनिवारी जेद्दाहहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळावर आलेल्या एका प्रवाशाला हवाई गुप्तचर विभागाने संशयावरुन ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाची तपासणी केल्यानंतर दोन इलेक्ट्रीक इस्त्री सापडल्या. या इस्त्रीचे स्कॅनरद्वारे तपासणी केल्यानंतर त्यात काहीतरी संशयास्पद वस्तू असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्या इस्त्री ओपन करुन त्यातून सोन्याचे सोळा पीस जप्त करण्यात आले.
बाराशे ग्रॅम वजनाच्या या पीसची किंमत एक कोटी दोन लाख रुपये आहे. ते सोने नंतर जप्त करण्यात आले होते. सीमा शुल्क कायद्यानुसार त्याची जबानी नोंदवून त्याला सोने तस्करीच्या गुन्ह्यांत या अधिकार्यांनी अटक केली. त्याला ते सोने कोणी दिले होते, ते सोने तो कोणाला देणार होता, त्याने यापूर्वीही सोन्याची तस्करी केली होती का याचा तपास सुरु आहे.