भाई बोलला नाही म्हणून तरुणावर तिघांकडून हल्ला

हल्ल्यानंतर पळून गेलेल्या तिन्ही आरोपींचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2025
मुंबई, – भाई बोलला नाही म्हणून अरबाज अजीज खान या 25 वर्षांच्या डिलीव्हरी बॉय असलेल्या तरुणावर तिघांनी प्राणघातक हल्ला केला. लाथ्याबुक्यांसह तिक्ष्ण हत्याराने केलेल्या मारहाणीत अरबाज हा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध आंबोली पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिरोज मौल्ला शेख, शादाब काझी ऊर्फ चढ्ढा, इब्राहिम मुजावर आणि निलेश गायकवाड अशी या चौघांची नावे आहेत. हल्ल्यानंतर ते तिघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

अरबाज खान हा अंधेरीतील विरा देसाई रोड, रिहाब इमारतीमध्ये राहत असून डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. याच परिसरात चारही आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. फिरोज हा स्वतला भाई समजतो. त्याची तिथे प्रचंड दशहत आहेत. घरी जाताना अरबाजने फिरोजला पाहून भाई बोलला नाही. त्याचा त्याच्या मनात राग होता. शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजता रिहाब इमारतीसमोरील मैदानात होता. यावेळी तिथे फिरोजसह इतर तीन तरुण आले. त्यांनी त्याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. यावेळी अरबाजला वाचविण्यासाठी तिथे काही लोक पुढे आली होती.

मात्र शादाबने त्यांना कोणीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्वजण पळून गेले होते. काही वेळानंतर शादाबने अरबाजवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ झालेल्या अरबाजला पाहून या आरोपींनी यह तो ट्रेलर था, रात को पुरी फिल्म दिखाता हूॅ और तुझे खत्म ही करता हूँ अशी धमकी दिली होती. त्यानंतर ते चौघेही पळून गेले होते. ही माहिती समजताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

जखमी झालेल्या अरबाजला पोलिसांनी तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. याप्रकरणी अरबाजने घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली हेती. या तक्रारीनंतर फिरोज शेख, शादाब काझी, इब्राहिम चढ्ढा आणि निलेश गायकवाड या चौघांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page