प्रयागराज कुंभमेळ्याचे इव्हेट मॅनेजमेंटचे काम देण्याच्या आमिषाने फसवणुक
इव्हेंट व्यावसायिकाला गंडा घालणार्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 सप्टेंबर 2025
मुंबई, – उत्तरप्रदेशातील प्रयागराज कुंभमेळ्याचे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम मिळवून देतो अशी बतावणी करुन एका इव्हेट व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आशुतोष उपाध्याय या भामट्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आशुतोषने तो केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागात विशेष कार्यकारी अधिकारी तसेच प्रयागराज कुंभमेळ्याच्या कमिटीवर सभासद असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडून कामासाठी 12 लाख 80 हजार रुपये घेऊन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अजय रामजसपाल मॉडगीळ हे अंधेरी परिसरात राहत असून त्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. त्यांची एडव्हरटेनमेंट नावाची इव्हेंट कंपनी असून या कंपनीचे मुख्य कार्यालय अंधेरीतील न्यू लिंक रोड, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आहे. गेल्या वर्षी ते लखनऊ-मुंबई असा विमान प्रवास करत होते. यावेळी त्यांची बाजूलाच बसलेल्या आशुतोष उपाध्यायशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. काही दिवसांनी त्याने त्यांना एका महत्त्वाच्या कामासाठी कॉल केला होता. यावेळी त्यांनी त्याला त्यांच्या कार्यालयात बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे आशुतोष हा त्यांच्या कार्यालयात आला होता. यावेळी त्याने त्यांना त्याचे एक व्हिजिटिंग कार्ड दिले होते. त्यात त्याच्या नावाच्या उल्लेख होता.
इतकेच नव्हे तर तो आदर्श ब्राम्हण फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, ह्युमन राईट अॅण्ड सोशयिल जस्टीस कमिशन, लॅप्रोसी प्रोजेक्ट मेंबर, क्वांटम लाईफ लाईन युनिट आणि ब्रेंझ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असल्याचे नमूद केले होते. उत्तरप्रदेश शासनाने प्रयागराज येथे भव्यदिव्य अशा कुंभमेळ्याचे आयोजन केले असून त्याच्या कमिटीवर त्याची अधिकृत प्रतिनिधी महणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कुंभमेळ्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आहे, ते काम तुम्हाला मिळाले तर त्यांना चांगला फायदा होईल. तो स्वत प्लॉनिंग कमिटीवर असल्याने त्याला उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे टेंडर मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांना आधी नावनोंदणी करावी लागणार असून त्यासाठी 2 लाख 80 हजार रुपये फी भरावी लागेल असे सांगितले. यावेळी अजय मॉडगीळ यांनी विचार करुन कळवतो असे सांगितले. त्यानंतर तो त्यांना सतत कॉल करुन विचारणा करत होता. कुंभमेळ्याच्या इव्हेंटच्या कामात त्यांना चांगला फायदा होणार असलयाने तो सतत सांगत होता. त्यामुळे त्यांनी त्याल होकार दर्शविला होता. त्यानंतर नावनोंदणीसह इतर कामासाठी त्याला पैसे ट्रान्स्फर केले होते.
काही दिवसांनी त्याने त्यांना तुमचे काम झाले असून तातडीने दहा लाख रुपये जमा करा असे सांगितले. यावेळी त्याने त्यांना त्यांच्या कंपनीचे नावनोंदणी झाल्याचे कागदपत्रे पाठवून दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या बँक खात्यात दहा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर अजय मॉडगीळ हे त्याला सतत कॉल करुन प्रयागराज येथील काम कधी सुरु होईल, त्यांच्या पैशांचे काय झाले याबाबत विचारणा करत होते. मात्र तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याची शहानिशा केली असता त्याला दिलेले कागदपत्रे बोगस होती. उत्तरप्रदेशच्या वेबसाईटवर त्यांच्या कंपनीचे कुठेही नावनोंदणी झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांनी इव्हेंट कामासाठी घेतलेल्या 12 लाख 80 हजार रुपयांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना एक धनादेश दिला होता. मात्र धनादेशावर स्वाक्षरी चुकी असल्याने तो धनादेश बँकेत न वटता परत आला होता.
अशा प्रकारे आशुतोष उपाध्याय याने अजय मॉडगीळ यांना उत्तरप्रदेशात होणार्या कुंभमेळ्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटचे काम देतो असे सांगून त्यांची फसणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आशुतोष उपाध्याय याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.