प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा
लग्नाच्या आमिषाने फसवणुक करुन मानसिक शोषण केला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2025
मुंबई, – अंधेरी येथे राहणार्या एका 23 वर्षांच्या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पोलीस शिपाई असलेल्या मित्राविरुद्ध आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शर्मिन डेव्हीड रॉड्रिक्स असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून तिच्या प्रियकराचे नाव समय प्रशांत दळवी (24) असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर शर्मिनला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणुक, तिचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच समय हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. समय हा सध्या ठाणे पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिलिना डेव्हीड रॉड्रिक्स ही 50 वर्षांची महिला अंधेरीतील आंबोली, सिझर रोड, वाहतूकनगरात राहते. तिचे दोन्ही मुलगी शर्मिन आणि जोअॅन हे खाजगी कंपनीत कामाला होते. दिड महिन्यांपूर्वीच तिची मोठी मुलगी शर्मिनने नोकरी सोडली होती. घरात असताना ती मिलिनाला टिफिन सर्व्हिसमध्ये मदत करत होती. याच परिसरात समय दळवी हा तरुण राहत असून तो शर्लिनच्या परिचित होता. या दोघांमध्ये मैत्री होती. गेल्या चार वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाला मिलिनाचा विरोध होता. मात्र त्यांच्यात शारीरिक संबंध आल्याचे समजताच तिने त्यांच्या लग्नाला होकार दिला होता. याच दरम्यान समय दळवी पोलीस दलात सामिल झाला होता. सध्या तो ठाणे पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे.
समयला दारु पिण्याचे व्यसन होते, त्यामुळे तो शर्मिनकडे सतत दारुसाठी पैशांची मागणी करत होता. त्यावरुन त्यांच्यात सतत खटके उडत होते. त्यातून तो तिला मारहाण करत होता. समय हा त्याच्या आत्यासोबत राहत होता. त्यामुळे त्यांच्या प्रेमासह लग्नाविषयी तिने तिच्या आत्याला सांगितले होते. मात्र शर्लिन ही ख्रिश्चन असल्याने तिचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे तो तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. लग्न केले तर आत्याच्या परवानगीने करणार असल्याचे तो सांगत होता. याच कारणावरुन त्यांच्यात भांडण होत होती. त्यामुळे तो तिला मारहाण केली. या मारहाणीची तिने समयविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. समयसोबत आलेल्या शारीरिक संबंधानंतर शर्मिन ही दोन वेळा गरोदर राहिली होती, मात्र तिने दोन्ही वेळेस गर्भपात केला होता. तिचे समयवर प्रचंड प्रेम होते, त्यामुळे अनेकदा वादविवाद होऊन ती त्याला भेटण्यासाठी जात होती.
या भेटीदरम्यान तो अनेकदा तिच्यासोबत जबदस्तीने लैगिंक अत्याचार करत होता. तिला मोबाईलवरुन अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठविण्यास प्रवृत्त करत होता. तिने तसे न केल्यास तिच्या आईसह बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत होता. नोकरी सोडल्यानंतर शर्मिन ही घरात तिच्या आईला मदत करत होती. सर्व काही सुरळीत सुरु असताना काही दिवसांपासून ती प्रचंड मानसिक तणावात होती. 23 मार्चला तिने घरातील दैनदिन कामात तिच्या आईला मदत केली होती. तिच्या आईची प्रकृती ठिक नसल्याने ती तिच्या लहान मुलीसोबत जवळच्या क्लिनिकमध्ये गेली होती. यावेळी शर्मिन ही एकटीच घरात होती. दुपारी दोन वाजता ती वांद्रे येथे गेली होती. यावेळी शर्लिन तिच्यासोबत जाणार होती. मात्र तिने तिच्या आईला पुढे जाण्यास सांगून ती मैत्रिणीसोबत नंतर येते असे सांगितले होते.
मात्र ती तिथे आली नाही. सायंकाळी पावणेसहा वाजता मिलिना ही वांद्रे येथून घरीआली होती. यावेळी शर्लिनने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तिने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी तिला शर्मिनने घरातच सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी तिला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने समयला उद्देशून एक व्हिडीओ बनविला होता, मात्र तो व्हिडीओ तिने त्याला पाठविला नव्हता. हा व्हिडीओ तिच्या मुलीने समयला पाठविला होता.
दुसर्या दिवशी कपाटात तिला शर्लिनने लिहिलेले तीन पानी मनोगत पत्र सापडले. त्यात तिने समयला भेटल्यानंतर घडलेल्या घटनाक्रम लिहिला होता. त्यात अनेक गोष्टींचा उल्लेख होता. या पत्रावरुन समयमुळे शर्लिन ही मानसिक तणवात होता. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणुक केली होती. दारुसह इतर कारणावरुन तो तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण करत होता. त्याला कंटाळून ती मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यामुळे मिलिनाने समय दळवीविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी शर्मिनचा मानसिक व शारीरिक शोषण करणे, लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणुक करणे तसेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून गुन्हा दाखल होण्यापूर्वीच समय हा पळून गेला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.