ड्रग्जच्या गुन्ह्यांत आरोपीला दहा वर्षांचा कारावासाची शिक्षा

तीन वर्षांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन आरोपी दोषी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 डिसेंबर 2025
मुंबई, – ड्रग्जमिश्रीत सिरप विक्रीच्या गुन्ह्यांतील आरोपीला विशेष सेशन कोर्टाने दहा वर्षांच्या कारावासासह एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. बबलू पुनवासी गुप्ता असे या आरोपीचे नाव असून दंडाची रक्कम भरली नाहीतर त्याला आणखीन सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे. आहे. तीन वर्षांत या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानीनंतर आरोपीला दोषी ठरविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

रे रोड परिसरात काहीजण ड्रग्जमिश्रीत सिरप विक्रीसाठी येणार असल्याची माहिती आझाद मैदान युनिटच्या अधिकार्‍याां मिळाली होती. या माहितीनंतर 31 डिसेंबर 2021 रोजी संत सावता मार्ग, बीएमसी उदंचन केंद्राजवळ पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री पावणेबारा वाजता तिथे बबलू गुप्ता हा आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 40 हजार 800 रुपयांचा136 ड्रग्जमिश्रीत सिरपचा साठा जप्त केला होता.

याच गुन्ह्यांत नंतर आशा लिंगम या महिलेला पोलिसांनी अटक केली होती. तपास पूर्ण होताच या दोघांविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची अलीकडेच सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने बबलु गुप्ता याला दोषी ठरविले होते. 23 डिसेंबरला याच गुन्ह्यांत त्याला कोर्टाने दहा वर्षांच्या कारावासासह एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखीन सहा महिने कारावास भोगावा लागला आहे.

या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धराम म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पाटील, मानसिंग काळे यांनी केला तर पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस हवालदार मोहना आव्हाड, पोलीस हवालदार माणिकराव आधाव, महिला पोलीस शिपाई रोहिणी गावित, पोलीस नाईक अमोल पाटील यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले तर सरकारी अभियोक्ता शंकर एरंडे यांनी पोलिसांची बाजू कोर्टात सादर केली होती. तीन वर्षांत आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे सादर करुन साक्षीदारांच्या जबानीमुळे आरोपीला शिक्षा झाल्याने तपास पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page