डेबीट कार्ड काढताना म्युच्युअल फंड कंपनीच्या अधिकार्‍याचा मृत्यू

घटनेमागे घातपात नसून अपघात असल्याचे प्राथमिक अंदाज

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 फेब्रुवारी 2026
मुंबई, – सोमवारपासून मिसिंग असलेल्या एका खाजगी म्युच्युअल फंडाच्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. पंकित विजय शाह असे या 39 वर्षीय मृत अधिकार्‍याचे नाव असून या घटनेमागे घातपात नसून अपघात असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. डेबीट कार्ड काढताना तोल गेल्याने पंकितचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी एडीआरची नोंद आहे. पंकित शाहच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.

ही घटना मंगळवारी सकाळी दहा ते सव्वादहाच्या सुमारास अंधेरीतील तेलीगल्ली, हबटाऊन सोलारस लिमिटेडचया चड्डा प्रिमायसेसमध्ये घडली. पंकित शाह हा विलेपार्ले येथील बापूीाई वसी रोड, नीलमणी अपार्टमेंटमध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. सोमवारी तो घरातून बाहेर गेला आणि परत आला नाही. त्याच्या पालकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी त्याची जुहू पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याचा शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास चड्डा प्रियायसेस इमारतीवरुन एका व्यक्तीने उडी घेतल्याची माहिती अंधेरी पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करणयात आले होते. तिथे उपचारादरम्यान दुपारी पाऊणच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात सोमवारपासून मिसिंग असलेला तोच पंकित शाह असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्या पालकांना ही माहिती कळविण्यात आली होती. पंकित हा परळ येथील एका म्युच्युअर फंड कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होता. गेल्या वर्षी त्याला कंपनीमध्ये सीईओ म्हणून बढती मिळाली होती.

सोमवारी तो घरातून निघाला आणि त्याच्या मित्राकडे गेला होता. सकाळी तो त्याच्या अंधेरीतील मित्राच्या कार्यालयात आला होता. या मित्राचे चड्डा प्रिमायसेसच्या चौथ्या मजल्यावर कार्यालय आहे. तिथे खिडकीजवळ असताना त्याचा डेबीट कार्ड पडला होता. ते डेबीट कार्ड झाडूच्या सहाय्याने काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो इमारतीवरुन खाली पडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तपासादरम्यान या घटनेमागे घातपात नसून अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक अकोलकर हे करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंछर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page