लग्नाच्या आमिषाने दोन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
एका प्रियकराला अटक तर पळून गेलेल्या दुसर्याचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मे 2025
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने दोन अल्पवयीन मुलीवर त्यांच्याच प्रियकराने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकणी डी. एन नगर आणि आंबोली पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यां
तील एका प्रियकराला डी. एन नगर पोलिसाीं अटक केली तर पळून गेलेल्या दुसर्या प्रियकराचा आंबोली पोलिसांकडून शोध सुरु आहे. पहिल्या गुन्ह्यांतील पिडीत मुलगी पंधरा वर्षांची असून ती अंधेरी परिसरात राहते. याच परिसरात आदित्य नावाचा तरुण राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. काही महिन्यापूर्वी आदित्यने पिडीत मुलीला प्रपोज केले होते. त्याचे तिच्यावर खूप प्रेम असल्याचे त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. 3 मार्च ते 9 मे 2025 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अनेकदा जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यात ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. ही माहिती मिळताच डी. एन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पिडीत मुलीची जबानी नोंदवून घेतली होती. यावेळी तिने घडलेला प्रकार सांगून आरोपी प्रियकराविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसर्या गुन्ह्यांतील पिडीत तरुणी ही अठरा वर्षांची असून ती तिच्या कुटुंबियासोबत विरार येथे राहते. जोगेश्वरी येथे राहणार्या यश नावाच्या एका 22 वर्षांच्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून डिसेंबर 2022 रोजी त्याच्या घरासह लॉजमध्ये आणून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. याप्रकरणी तिने वसईच बोळी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा तपास आंबोली पोलिसाकडे वर्ग केला आहे. आरोपीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.