मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – गेस्ट हाऊसमध्ये चालणार्या एका सेक्स रॅकेटचा सहार पोलिसांनी पर्दाफाश करुन गेस्ट हाऊसच्या मॅनेजरसह मदतनीस अशा दोघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एक सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. अटक दोन्ही आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंधेरीतील मरोळ नाका, एक गेस्ट हाऊस असून तिथे सलमान हा मॅनेजर तर जबरुल हा मदतनीस म्हणून कामाला आहे. ते दोघेही आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या तरुणींना गेस्ट हाऊसमध्ये परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करुन तिथे एक प्रकारे सेक्स रॅकेट चालवत होते. ही माहिती मिळताच त्याची सहार पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच याच पथकाने मरोळ नाका परिसरात छापा टाकला होता. या छाप्यात सलमान आणि जबरुल या दोघांनाही पोलिसांनी अटक केली तर त्यांच्या तावडीतून एका सतरा वर्षांच्या मुलीची सुटका केली होती.
तिच्या चौकशीतून ते दोघेही तिला काही ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याचे सांगितले. ग्राहकांकडून मिळालेली काही रक्कम ते दोघेही तिला देत होते तर उर्वरित रक्कम ते दोघेजण घेत होते. या कबुलीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. बळीत मुलीला मेडीकलनंतर बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.