अंधेरीतील स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मॅनेजर महिलेस अटक करुन सात महिलांची सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जानेवारी २०२५
मुंबई, – अंधेरीतील एका पॉश स्पा सेंटरमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत जरीना नावाच्या मॅनेजर महिलेस पोलिसांनी अटक केली तर कारवाईत सात महिलांची सुटका केली. या महिलांना बोरिवलीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुनह्यांत रेहानउद्दीन लश्कर याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी भान्यायसह पिटा कलमांतर्गत कारवाई केली असून गुन्हा दाखल होताच जरीनाला पुढील चौकशीसाठी आंबोली पोलिसाकडे सोपविण्यात आले होते. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंधेरीतील न्यू लिंक रोड, क्रिस्टल पॉईट मॉलमध्ये शॉप क्रमांक २१६ मध्ये आरजे रॉय, लक्झरी नावाचे स्पा सेंटर आहे. या स्पामध्ये कामाला असलेल्या तरुणीसह महिलांच्या मदतीने स्पाचे मॅनेजर आणि चालक सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती अंमलबजावणी विभाागच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा केली होती. त्यानंतर या पथकाने तिथे छापा टाकून मॅनेजर महिला जरीनाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या स्पामध्ये पोलिसांना सात महिला सापडल्या. त्यांच्या चौकशीतून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर या सातही महिलांना ताब्यात घेण्यात आल होते. त्यांची मेडीकल करुन त्यांना बोरिवलीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.

याप्रकरणी महिला पोलीस हवालदार सुवर्णा गणपत पाटील हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जरीनासह रेहानउद्दीन लश्कर या दोघांविरुद्ध भारतीय न्यास सहिता आणि पिटाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत जरीना अटक करुन पुढील कारवाईसाठी आंबोली पोलिसाकडे सोपविण्यात आले. अटकेनंतर तिला दुसर्‍या दिवशी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रेहानउद्दीन हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३७ हजार ७०० रुपयांची कॅश, दोन मोबाईल, एक लॅपटॉप, काही कागदपत्रे आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page