५० कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी समन्स

ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्या अडचणीत वाढ

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ मार्च २०२४
मुंबई, – सुमारे ५० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांना मंगळवारी ५ मार्चला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले आहे. या प्रकरणात चौकशी होणार असल्याने अनिल देसाई यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जाते. याप्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नसून तक्रारीवरुन आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केल्याचे सांगण्यात आले.

खरी शिवसेना कोणाची यावरुन प्रचंड वाद सुरु झाल्यानंतर निवडणुक आयोगासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेना हे नाव आणि पक्षाचे चिन्ह दिले होते. असे असताना ठाकरे गटाने आयकर विभागासह टीडीएस लॉन इन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करुन सुमारे ५० कोटीचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. याबाबत त्यांच्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करणयात आली होती. ३० जानेवाररीला शिंदे गटाचे किरण पावसकर, बालाजी किणीकर, संजय मोरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकार संपूर्ण प्रकार सांगून चौकशी करण्याची विनंती केली होती. या तक्रार अर्जानंतर पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविला होता. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीला सुरुवात केली आहे.

प्राथमिक तपासात या संपूर्ण प्रकरणात अनिल देसाई यांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. येत्या मंग्ळवारी ५ मार्चला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनिल देसाई चौकशीसाठी हजर राहतील की नाही याबाबत संभ्रम आहे. दरम्यान याप्रकरणी तक्रार अर्ज प्राप्त झाला असला तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page