अनुपम खेर यांच्या कार्यालयातील चोरीचा पर्दाफाश

दोन्ही आरोपींना चोरीच्या बहुतांश मुद्देमालासह अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जून २०२४
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी अंधेरीतील सिनेअभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात आंबोली पोलिसांना यश आले आहे. चोरीनंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना काही तासांत पोलिीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा बहुतांश मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. रफिक माजिद शेख आणि मोहम्मद दिलशाद अब्दुल खान अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ३४ हजारााची कॅश, फिल्मची रिल, दोन हजाराची लोखंडी तिजोरी आदी मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही शनिवारी अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अनुपम खेर हे बॉलीवूड एक नामांकित अभिनेते असून त्यांच्या मालकीचे अंधेरीतील विरा देसाई रोड, आझाद नगर क्रमांक तीनमध्ये एक कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री काम संपल्यानंतर कार्यालयातील कर्मचारी टाळे लावून घरी गेले होते. दुसर्‍या दिवशी प्रविण शांताराम पाटील हे कार्यालयात आले होते, यावेळी त्यांना तिथे चोरी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश करुन चार लाख पंधरा हजाराची कॅशसहीत अनुपम खेरनिर्मित मैने गांधी क्यू मारा या चित्रपटाची एक फिल्म रिल, दोन हजाराची एक लोखंडी तिजोरी, एक काळ्या रंगाची बॅग आदी मुद्देमाल चोरी केला होता. याप्रकरणी प्रविण पाटील यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. यावेळी त्यांनी कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना दिले होते. या फुटेजमध्ये दोन तरुण कार्यालयात घुसून ही चोरी करताना दिसून आले होते. त्यामुळे आंबोली पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून आंबोली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे.

या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून आंबोली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिभाऊ बिरादार, घाडगे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार विलास दुलम, रमेश पाटील, गोरख पवार, प्रदीप कुलट, शिल्पेश कदम, पोलीस शिपाई शिवाजी कासार, सुनिल घुगे, निखील बाबर, संदीप सांगळे, गणेश मेश्राम यांनी तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पळून गेलेल्या रफिक शेख आणि मोहम्मद दिलशाद खान या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांकडून पोलिसांनी चोरीचा बहुतांश मुद्देमाल जप्त केला. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना शनिवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांकडून चोरीची उर्वरित रक्कम लवकरच हस्तगत केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page