अनुपम खैर यांच्या अंधेरीतील कार्यालयात चोरी

निगेटिव्ह रिळसह कॅश चोरट्यांनी पळवून नेली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० जून २०२४
मुंबई, – सिनेअभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात प्रवेश करुन दोन अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वत अनुपम खेर यांनी सोशल मिडीयावर ही माहिती देताना आंबोली पोलिसांत तक्रार केल्याचे सांगितले. दरम्यान या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून आंबोली पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे. या चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश करुन चार लाख पंधरा हजााची कॅश आणि मैने गांधी को क्यू मारा या चित्रपटाची निगेटिव्ह पळवून नेल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अनुपम खेर हे बॉलीवूड एक नामांकित अभिनेते असून त्यांच्या मालकीचे अंधेरीतील विरा देसाई परिसरात एक कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री काम संपल्यानंतर कार्यालयातील कर्मचारी टाळे लावून घरी गेले होते. दुसर्‍या दिवशी एक कर्मचारी कार्यालयात आला होता, यावेळी त्याला तिथे चोरी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश करुन कॅशसहीत निगेटिव्ह रिळ चोरी केली होती. ही माहिती नंतर कर्मचार्‍याने अनुपम खेर यांना फोनवरुन दिली होती. कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता रात्री उशिरा तिथे दोन तरुण कार्यालयात घुसले होते. या दोघांनी ड्राव्हरमधून कॅश आणि निगेटिव्ह रिळ घेऊन पलायन केले होते. ही माहिती नंतर आंबोली पोलिसांना देण्यात आली होती. कंपनीच्या अधिकार्‍याने सीसीटिव्ही फुटेज देऊन दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती. पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात ते दोघेही कार्यालयातून चोरी करुन बाहेर आल्यानंतर एका रिक्षातून निघून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे या रिक्षाचालकासह पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेकडून सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page