मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका दुकलीस ओशिवरा पोलिसांनी अटक केली. सितारामसिंग टक्कूसिंग टाक आणि विजय ऊर्फ पवन बलदेव सिंग अशी या दोघांची नावे असून ते दोघेही विरार आणि अंधेरीतील रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईदरम्यान त्यांचे तीन सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
जोगेश्वरी परिसरात काहीजण घातक शस्त्रांसह दरोड्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने जोगेश्वरीतील न्यू लिंक रोड, पाटलीपूत्रकडे जाणार्या रस्त्यावर साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री साडेबारा वाजता तिथे चार तरुण आले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांना पाहताच ते चौघेही पळू लागले. यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन पळून जाणार्या दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसंनी एक पाना, पाचहून विविध आकाराचे कैचीचा भाग, स्क्रू ड्राव्हर, मिरचीची पूड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत त्यांचे नाव सितारामसिंग आणि पवन सिंग असल्याचे उघडकीस आले.
यातील सितारामसिंग हा विरार येथे राहत असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात पाच घरफोडी, दहिसर पोलीस ठाण्यात एक अशा सहा गुन्ह्यांची नोंद आहे. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन त्यांचे तीन सहकारी आर. के सिंग आणि समीर सिंग आणि आर. के सिंग हे पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली ाहे. सितारामसिंग आणि पवन हे त्यांच्या तीन सहकार्यांसोबत जोगेश्वरी परिसरात दरोड्याच्या उद्देशाने जोगेश्वरीत आल्याचे सांगितले. मात्र दरोड्यापूर्वीच या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.