हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
बाईकचा धक्का लागला म्हणून केला होता चाकूने हल्ला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका रेकॉर्डवरील वॉण्टेड आरोपीस आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. आसिफ सलीम शेख ऊर्फ लंगडा असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यासह रेल्वे पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
प्रितम कवी उटकर हा तरुण 29 सप्टेंबरला अकरा वाता त्याच्या अॅक्टिव्हा बाईकवरुन जात होता. ही बाईक सातरस्ता येथील डॉ. ई मोसेज रोड, संतोषी माता मंदिरसमोरील कृष्णा वाईच्या बाजूने जात असताना बाईकचा आसिफला धक्का लागला होता. त्याचा राग आल्याने आसिफने प्रितमला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर त्याने त्याच्याकडील चाकूने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. मानेवर आणि पोटावर वार केल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, याच प्रयत्नात असताना त्याने त्याचा पाठलाग करुन त्याच्यावर पाठीवर चाकूने वार केले होते.
त्यात प्रितम हा गंभीररीत्या जखमी झाला होता. हल्ल्यानंतर आसिफ घटनास्थळाहून पळून गेला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या प्रितमला स्थानिक रहिवाशांनी उपचारासाठी नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव ेघतली होती. याप्रकरणी प्रितमच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आसिफ शेख याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आसिफ हा पळून गेला होता. तो स्वतचे अस्तित्व लपवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. त्याच्या अटकेसाठी आग्रीपाडा पोलिसांनी दोन विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्याचा शोध सुरु असताना त्याला बुधवारी या पथकाने अटक केली. तपासात आसिफ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सीएसएमटी, कल्याण, दादर रेल्वे पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद आहे.