दारु आणण्यास नकार दिला म्हणून स्विमिंग ट्रेनरवर हल्ला

हल्ल्यानंतर पळून गेलेल्या मारेकर्‍याचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 जून 2025
मुंबई, – दारु आणण्यास नकार दिला म्हणून किरण शहाजी कसबे या 31 वर्षांच्या स्विमिंग ट्रेनरवर त्याच्याच परिचित व्यक्तीने सिमेंटच्या लादीने प्राणघातक हल्ला केला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने किरणला केईएम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. तीन दिवसांनंतर किरणच्या जबानीवरुन मानखुर्द पोलिसांनी राम गायकवाड या मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही घटना मंगळवारी 16 जूनला सकाळी दहा वाजता माखुर्द येथील वीर जिजामाता भोसले मार्ग, ट्रॉन्झिंट कॅम्पजवळ घडली. याच परिसरात किरण कसबे हा राहत असून तो स्विमिंग ट्रेनर म्हणून काम करतो. आरोपी राम गायकवाड हा याच परिसरात राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. मंगळवारी 17 जूनला ट्रॉन्झिंट कॅम्प परिसरात किरण हा बसला होता. यावेळी तिथे राम आला आणि त्याने त्याला दारु मागव असे सांगितले. मात्र त्याने दारु आणण्यास नकार दिला होता. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

त्यातून रागाच्या भरात रामने किरणला शिवीगाळ करुन तू मला ओळखत नाही. आता तुझा गेम करतो असे सांगून त्याच्यावर सिमेंटच्या लादीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात किरण हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारानंतर त्याला घरी सोडून देण्यताआले. ही माहिती मिळताच गुरुवारी किरण कसबे याची जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर राम गायकवाड याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर राम हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

धक्काबुक्कीवरुन 25 वर्षांच्या तरुणावर हल्ला
अशाच दुसर्‍या घटनेत गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात एका 25 वर्षांच्या तरुणाला चाकूने भोसकण्यात आले. त्यात सलीम सनाउल्ला पठाण हा 25 वर्षांचा तरुण जखमी झाला असून त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी रमजानअली मोहम्मद अली कुरेशी या आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. धक्काबुक्कीवरुन झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. माजिद हिदायतुल्ला मलिक हा तरुण गोवंडी येथे राहत असून जखमी सलीम हा त्याचा मित्र आहे. गुरुवारी रात्री उशिरा अडीच वाजता माजिद, रमजानअली, सलीम रहिमानिया चॅरिटेबल ट्रस्टसमोर मस्ती करत होते. एकमेकांना धक्का देत होते.

यावेळी झालेल्या वादातून रमजानअलीने सलीमला तुला जिवंत सोडत नाही. तुझा मर्डरच करतो अशी धमकी देत त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसंनी रमजानअलीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. तीन वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page