मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांना देण्यात आली नव्हती असा खुलासा रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. मात्र त्यांच्यासोबत तीन पोलीस कर्मचारी तैनात होते. गोळीबाराच्या वेळेस त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी तैनात होता असेही सांगितले. भायखळा येथे राष्ट्रवादीचा पदाधिकारी सचिन कुर्मी यांच्या हत्येनंतर शनिवारी दसर्याच्या रात्री बाबा सिद्धीकी यांची वांद्रे येथे तीन मारेकर्यांनी गोळी झाडून हत्या केली होती. या हत्येच्या घटनेने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्हे निर्माण झाले असून विरोधकांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यात बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. सुरुवातीला बाबा सिद्धीकी यांना पंधरा दिवसांपूर्वीच जिवे मारण्याची धमकी आली होती. या धमकीनंतर त्यांना मुंबई पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र रविवारी पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी बाबा सिद्धीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा नव्हती असे सांगताना त्यांच्यासोबत तीन पोलीस कर्मचारी तैनात होते. गोळीबाराच्या वेळेस त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी तैनात होता. त्यांना धमकी आली होती का, हत्येामागील कारण काय, या हत्येमागे विष्णोई टोळीचा सहभाग आहे का, मारेकर्यांनी रेकी करुन ही हत्या घडवून आणली यासह इतर प्रश्नांना त्यांनी काहीही उत्तर देण्याचे टाळले. आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहे. तपास सुरु असल्याने आताच काहीही सांगणे उचित ठरणार नाही असे सांगितले.
एपीआय राजेंद्र दाभाडे यांच्यामुळेच दोन्ही मारेकरी सापडले
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर तिन्ही मारेकरी टॅक्सीने खेरनगर परिसरात आले होते. कार्यालयातून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर मिरचीची स्प्रे मारुन नंतर गोळीबार करण्याची त्यांची योजना होती. मात्र तिथे प्रचंड गर्दी होती. गर्दीत गोळीबार केल्यास पळताना अडथळा होऊ शकतो, आपण पकडले जाऊ शकतो म्हणून ते तिघेही काही वेळ तिथेच थांबले होते. ठरल्याप्रमाणे बाबा सिद्धीकी बाहेर आल्यानंतर स्प्रे मारण्यापूर्वी शिवाने त्यांच्यावर गोळीबार केला होता. गोळीबारानंतर पळून जाणार्या गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप या दोघांनाही निर्मालनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र दाभाडे व त्यांच्या पथकाने शिताफीने अटक केली. यावेळी राजेंद्र दाभाडे हे त्यांच्या पथकाने तिथे गस्त घालत होते. मात्र या पोलिसांनी स्वतच्या जिवाची पर्वा न करता पळून जाणार्या दोघांना शिताफीने पकडले आणि पोलीस ठाण्यात आणले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र दाभाडे व त्यांच्या पथकाने पोलीस आयुक्तांनी कौतुक केले होते. मात्र तिसरा आरोपी शिवकुमार गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला होता. मात्र दोन्ही मारेकरी पकडले गेल्याने या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.