ग्रँटरोडच्या कुंटनखान्यातील छाप्यात 45 महिलांची सुटका

बचाव ऑपरेशनतंर्गत मुंबई पोलिसांची धडक कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 जून 2025
मुंबई, – मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या बचाव ऑपरेशला शनिवारी मोठे यश मिळाले, ग्रँटरोडच्या दोन इमारतीमध्ये सुरु असलेल्या कुंटखान्यात पोलीस उपायुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या विशेष पथकाने छापा टाकून 45 महिलांची सुटका केली. त्यात काही बांगलादेशी महिलांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी पंचवीस तस्करासह पाच दलाल आणि एकोणीस ग्राहक अशा 49 जणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पिटासह अन्य कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सुटका केलेल्या विविध आमिष दाखवून मुंबईत आणून त्यांना कोंडून ठेवून जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गेल्या काही वर्षांत विविध शहरातून तरुणीसह महिलांना नोकरीसह अन्य कारण सांगून मुंबईत आणून ग्रँटरोड येथील कुंटखान्यात डांबून, जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात होते. काही कारवायांमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी अशा कुंटनखान्यात सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. बचाव ऑपरेशन या मोहीमेतंर्गत पोलिसांनी आतापर्यंत काही कुंटखान्यात छापा टाकून अनेक तरुणीसह महिलांची सुटका करुन त्यांना तिथे जबस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणार्‍या कुंटनखाना मालकासह मॅनेजर, दलालांना अटक केली होती. ही मोहीम सुरु असताना शनिवारी ग्रँटरोडच्या काही इमारतीमध्ये अशाच प्रकारे कुंटखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलीस उपायुक्त मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा या संस्थेने स्थानिक पोलिसांसह इतरांच्या मदतीने शनिवारी सायंकाळी एका विशेष मोहीमेतर्गत दोन इमारतीमध्ये सुरु असलेल्या कुंटखान्यात छापा टाकला होता. यावेळी 45 महिलांची पोलिसांनी सुटका केली, त्यात काही बांगलादेशी महिलांचा समावेश होता. पिडीत महिलांना सीलबंद केलेल्या दरवाजे आणि खिडक्यांमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. काही महिने त्यांना सूर्यप्रकाश आणि बाहेरील जगाची काहीच माहिती नव्हती. एका मुलीला स्वयपाक घरातील एका डब्ब्यात लपवून ठेवण्यात आले. ऑक्सिजनच्या कमरतेमुळे तिला गुदमल्यासारखे झाले होते, त्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. बेशुद्धावस्थेत तिला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

या कारवाईत पोलिसांनी 49 जणांना अटक केली. त्यात 25 तस्करासह 5 दलाल आणि 19 ग्राहकांचा समावेश होता. सुटका केलेल्या सर्व तरुणीसह महिलांची मेडीकल करण्यात आली. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. यातील बहुतांश तरुणीसह महिला बांगलादेश तसेच इतर राज्यातील रहिवाशी आहेत. या सर्वांना नोकरीसह इतर आमिष दाखवून मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कुंटखान्यात जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात होते.

शनिवारी सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केल्याने या सर्व तरुणीसह महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणार्‍या आरोपीविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहे. बचाव ऑपरेशन मोहीम यापुढे अशीच सुरु राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page