चार वर्षांच्या मुलावर अनैसगिंक लैगिंक अत्याचार

गुन्हा दाखल होताच 47 वर्षांच्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 एप्रिल 2025
मुंबई, – चार वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच शेजारी राहणार्‍या व्यक्तीने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 47 वर्षांच्या आरोपीस भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

38 वर्षाचे तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत भांडुप परिसरात राहत असून ते टेम्पोचालक म्हणून काम करतात. त्यांना चार वर्षांचा एक मुलगा आहे. याच परिसरात आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचा मुलगा घरासमोरच बसला होता. यावेळी आरोपीने त्याला त्याच्या घरी खेळण्यासाठी बोलाविले होते. तो घरी गेल्यानंतर त्याने त्याचे कपडे काढून त्याच्यावर अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकारामुळे तो प्रचंड घाबरला होता. भीतीपोटी त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. हा प्रकार त्याच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी त्याची विचारपूस केली होती, यावेळी त्याने घडलेला प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला होता.

मुलाकडून ही माहिती समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीस मंगळवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दुपारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलाला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथेच त्याची मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत फॉरेन्सिक पथकाची भांडुप पोलिसांकडून मदत घेतली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page