सतरा वर्षांच्या मुलीशी बालविवाह करुन लैगिंक अत्याचार
पतीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी बालविवाह करुन जबदस्तीने लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध सहार पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत पतीला अद्याप अटक झाली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी अंधेरीतील सहार, मरोळ पाईपलाईन परिसरात राहतो. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत सतरा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह केला होता. विवाहानंतर १३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. त्यामुळे तिला उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकार्यांनी पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पिडीत मुलीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतल्यांनतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांच्या वतीने एका महिला पोलीस शिपायाच्या तक्रार अर्जावरुन सहार पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध ३७६ भारतीय दंड सहिता ४, ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप आरोपी पतीला अटक झाली नाही. लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. लग्नाच्या वेळेस पिडीत मुलगी सोळा वर्षांची होती. ती अल्पवयीन असल्याने त्याने तिच्याशी लग्न करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्यामुळे या संपूर्ण घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सहार पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.