बालाजी टेलिफिल्म कार्यालयातील चोरीप्रकरणी आरोपीस अटक

अकरा एसीच्या तांब्याचे पाईप, नटबोल्ट, कॉईलची चोरी केली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 मे 2025
मुबई, – गोरेगाव येथील बालाजी टेलिफिल्म लिमिटेड कार्यालयात प्रवेश करुन अकरा एसी मशिनच्या तांब्याचे पाईप, अकरा पितळी नटबोल्ट आणि अकरा तांब्याचे कॉईल आदी मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या आरोपीस आरे पोलिसांनी अटक केली. विजेंद्र धर्मलिंगम मुदलीयार असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

एजाज अहमद अब्दुल लतीफ शेख हे गोरेगाव येथे राहत असून ते बालाजी टेलिफिल्मस लिमिटेड या कंपनीत प्रशासकीय अधिकारी कामाला आहे. या कंपनीचे गोरेगाव येथील कालिया मैदान एक परिसरात एक कार्यालय आहे. 13 फेब्रुवारीला ते सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आले होते. त्यानंतर कार्यालयातील क्रोमा प्लोअरच्या हॉलमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचे काम करत होते. यावेळी त्यांना कार्यालयातील अकरा अकरा एसी मशिनच्या तांब्याचे पाईप, अकरा पितळी नटबोल्ट आणि अकरा तांब्याचे कॉईल आदी मुद्देमाल चोरी गेल्याचे दिसून आले. अज्ञात व्यक्तीने कार्यालयात प्रवेश करुन ही चोरी करुन पलायन केले होते.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी आरे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तीन दिवसांपूर्वी विजेंद्र मुदलीयार याला संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच 13 फेब्रुवारीला बालाजी टेलिफिल्म लिमिटेडच्या कार्यालयात प्रवेश करुन ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page