अश्‍लील व्हिडीआ व्हायरची धमकी देऊन खंडणीची मागणी

खंडणीसाठी धमकाविणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – प्रेयसीसोबतचे अश्‍लील व्हिडीओ व्हॉटअपवर पाठवून तो व्हिडीओ सोयल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका २६ वर्षांच्या तरुणाकडे अज्ञात व्यक्तीने खंडणीची मागणी केल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

२६ वर्षांचा तक्रारदार तरुण हा वांद्रे येथील बेहरामनगर, मुन्ना इस्तियाकी चाळीत राहत असून शिलाई काम करतो. याच परिसरात राहणार्‍या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध आहे. अनेकदा ते दोघेही भेटतात, एकत्र फिरायला जातात. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्याला एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने त्याला त्याच्या प्रेयसीसोबत काही अश्‍लील व्हिडीओ असल्याचे सांगून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्याचा विश्‍वास बसवा म्हणून त्याने त्यांच्यातील शारीरिक संबंधाचा एक अश्‍लील व्हिडीओ त्याला व्हॉटअपवर पाठविला होता. व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी त्याने त्याच्याकडे सत्तर हजाराच्या खंडणीची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

या प्रकाराने तो प्रचंड घाबरला होता. स्वतसह प्रेयसीची बदनामी होऊ नये म्हणून त्याने त्याला पैसे पाठविण्याची तयारी दर्शविली होती. घडलेला प्रकार त्याने निर्मलनगर पोलिसांना अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी ब्लॅकमेल करुन अश्‍लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात या व्यक्तीने तक्रारदार तरुणाचे त्याच्या प्रेयसीसोबतचे शारीरिक संबंधाचे अश्‍लील व्हिडीओ लपवून बनवून तो व्हिडीओ त्याला पाठवून खंडणीची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ज्या मोबाईलवरुन त्याला धमकी आली होती, त्याची माहिती काढून आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page