भूमीपूजनाच्या कार्यक्रमांत अश्लील चाळे करुन खंडणीची मागणी

चार तृतीयपंथीविरुद्ध गुन्हा दाखल तर नोटीस देऊन सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 फेब्रुवारी 2026
मुंबई, – वांद्रे येथील एका इमारतीच्या भूमीपूजनाच्या वेळेस असभ्य वर्तन करुन साडेपाच लाखांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी चार तृतीयपंथीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुगंधी पिल्ले, नागराज पिल्ले, प्रिया पोन्नूस्वामी आणि विमला अशी या चौघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत दोन तृतीयपंथींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. नंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या चारही तृतीयपंथींना भूमीपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान प्रचंड गाेंंधळ घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलीस बंदोबस्तात भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडल्याचे पोलिसांनी सांगितले.

आकाश दिलीप पाटील हे ठाण्यातील रहिवाशी असून सुरक्षा रियालिटी या कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करतात. सध्या त्यांची नेमणूक वांद्रे येथील हिल रोड, बे व्हयू परिसरात आहे. या ठिकाणी जीव्हीपी रियलिटी कंपनीकडून इमारतीचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी शनिवारी तिथे भूमीपूजनाचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम सुरु असताना दुपारी पाऊणच्या सुमारास तिथे दोन तृतीयपंथी रिक्षातून आले होते. त्यांनी तिथे जबदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्यांना अडविले असता त्यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करुन दमदाटी केली. ओनर को बुलाओ नही तो हम यहॉ पर नंगा होंगे अशी धमकी दिली. त्यानंतर त्यातील एकाने त्यांच्याकडे साडेपाच लाख रुपये घेऊन या, नाहीतर तिथे भूमीपूजन होणार नाही. यावेळी आकाश पाटील यांनी त्यांना पैसे देण्यास नकार देत त्यांना तेथून जाण्याचा सल्ला दिला.

त्याचा राग आल्याने त्यांनी तिथेच स्वतचे कपडे काढून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्यांना तिथे भूमीपूजनचे काम सुरु आहे. शुभ कार्य सुरु असून त्यात तुम्ही बाधा आणू नका असे सांगून ते दोघेही गेटच्या पत्र्याच्या वर्तुळात वाय एक्स लिहून त्याखाली ज्योती नाव आणि मोबाईल क्रमांक दिला होता. साडेपाच लाख रुपये दिले नाहीतर त्यांच्या संपूर्ण टोळीला तिथे आणू, तिथे नंगा नाच करु, तुमचा कार्यक्रम खराब करुन टाकू, तुमचे पाहुणे आतमध्ये कसे जातात ते पाहू अशी धमकी देऊ लागले होते. या प्रकाराने तेथील वातावरण चांगले तापले होते. त्यामुळे त्यांचे मालक शाम मेहता यांनी वांद्रे पोलिसांना ही माहिती दिली होती.

या माहितीनंतर पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सचिन ढवळे व अन्य पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तिथे पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे ते दोघेही साईटजवळ थांबून होते. सायंकाळी पावणेसात वाजता तिथे इतर दोन तृतीयपंथी आले होते. त्यांनी त्यांना पुन्हा दमदाटी करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांनी सकाळी आलेले तृतीयपंथी त्यांच्या टोळीतील असून त्यांना पैसे घेण्यासाठी पाठविले होते. मात्र तुम्ही पैसे दिले नाही. त्यानंतर या दोघांनाही तिथे अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तिथे उपस्थित पोलिसांनी वेळीच दोघांना थांबवून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांनाही नंतर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी आकाश पाटील यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या आरोपी तृतीयपंथीविरुद्ध खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या चौकशीत दुपारी आलेल्या दोन तृतीयपंथीचे नाव प्रिया पोन्नूस्वामी आणि विमला असल्याचे उघडकीस आले होते. पोलीस ठाण्यात आणलेल्या दोन्ही तृतीयपंथींना नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. त्यांना योग्य ती समज देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page