अश्‍लील मॅसेज पाठवून तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी

वांद्रे येथील घटना; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ जुलै २०२४
मुंबई, – कॉलसह अश्‍लील मॅसेज पाठवून शारीरिक सुखाची मागणी करुन एका २३ वर्षांच्या तरुणीची विनयभंग करुन मानसिक शोषण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत या व्यक्तीने  एकोणीसहून अधिक मोबाईलवरुन या तरुणीला कॉलसह अश्‍लील मॅसेज करुन शारीरिक सुखाची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे आरोपीच्या अटकेसाठी वांद्रे पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी संमातर तपास सुरु केला आहे.

तक्रारदार तरुणी ही तिच्या आई-वडिल भावासोबत वांद्रे येथील पालीनाका परिसरात राहते. गेल्या चार वर्षांपासून ती एका रियल इस्टेट कंपनीत कामाला आहे. जानेवारी महिन्यांत तिचा वाढदिवस असतो. त्यामुळे तिला वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे अनेक कॉल आणि मॅसेज आले होते. दुपारी दोन वाजता तिला एका अज्ञात मोबाईलवरुन व्हॉटअप कॉल आला होता. या व्यक्तीने तिच्यासोबत मैत्री करुन मला भेटशील का अशी विचारणा करुन तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली होती. या घटनेनंतर तिने लगेच तो कॉल बंद करुन त्याला ब्लॉक केले होते. त्यानंतर संबंधित व्यक्ती वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन तिला दर दहा ते पंधरा दिवसांत कॉलसह अश्‍लील मॅसेज पाठवून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करत होता. प्रत्येक वेळेस ती त्याचा क्रमांक ब्लॉक करत होती. तरीही तो कॉल करुन तिचा मानसिक शोषण करत होता.

गुरुवारी ११ जुलैला तिला पुन्हा त्याच व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तिला तीन तासांसाठी घर पाहिजे असल्याचे सांगितले. तिने तीन तासांबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आहे असे सांगून तिच्याशी पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला. घडलेला प्रकार नंतर तिने तिच्या वरिष्ठांसह पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर ती वांद्रे पोलीस ठाण्यात आली आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला सांगून १९ मोबाईल क्रमांक दिले होते. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ७८, ७९ भारतीय न्याय संहिता सहकलम ६७ आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तिने दिलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती काढण्याचे काम सुरु असून लवकरच या आरोपीला अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page