मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 सप्टेंबर 2025
मुंबई, – ओमानच्या मस्तत शहरातून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या निरंजननाथ सुभलचंद्र नाथ या बांगलादेशी नागरिकाला इमिग्रेशन अधिकार्यांनी अटक केली. त्याच्याकडून या अधिकार्यांनी एक बांगलादेशी पासपोर्ट आणि एक बोगस भारतीय पासपोर्ट जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अजयकुमार मोहनलाल मीना हे विरार येथे राहत असून आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी रात्री आठ वाजता ते विदेशातून मुंबईत आलेल्या प्रवाशांचे इमिग्रेशन कागदपत्रांची पाहणी करत होते. गुरुवारी पहाटे पाच वाजता निरंजन नाथ नावाचा एक प्रवाशी ओमानच्या मस्कतहून मुंबईत आला होता. त्याच्या पासपोर्टची पाहणी केल्यानंतर तो अनेकदा विदेशात गेल्याचे दिसून आले. या विदेश दौर्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले. 2010 साली तो बांगलादेशातून भारतात आला होता.
कोलकाता येथील नॉर्थ 24 परगना येथे वास्तव्यास असताना त्याने स्वतचे बोगस आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज बनविले होते. त्यानंतर एका एजंटच्या मदतीने त्याने भारतीय पासपोर्ट मिळविले होते. 2020 साली पासपोर्टची वैधता संपताच त्याने पासपोर्टचे नूतनीकरण केले होते. याच पासपोर्टवर तो विदेशात नोकरीसाठी गेला होता. मे 2025 साली तो मस्कतला गेला होता आणि 10 सप्टेंबरला तो पुन्हा मुंबईत आला होता. 2018 साली त्याने बांगलादेशी पासपोर्टवर टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज केला होता. यावेळी त्याला व्हिसा मिळाला होता. मात्र 2019 साली त्याला भारताचा व्हिसा नाकारण्यात आला होता. त्याच्याकडून या अधिकार्यांनी बांगलादेशासह बोगस भारतीय पासपोर्ट जप्त केला आहे.
याच गुन्ह्यांत नंतर त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी अजयकुमार मीना यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी निरंजननाथ याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.