शहरात वास्तव्यास असलेल्या 21 बांगलादेशींना अंधेरीतून अटक

एक महिला, दोन पुरुष व अठरा तृतीयपंथींचा समावेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 फेब्रुवारी 2026
मुंबई, – उपासमारीसह बेरोजगारीला कंटाळून नोकरीसाठी बांगलादेशातून आलेल्या, मुंबईसह इतर शहरात वास्तव्यास असलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना वर्सोवा पोलिसांच्या एटीएसच्या अधिकार्‍यांनी अंधेरी येथून अटक केली. एका आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाईची वर्सोवा पोलिसांची ही पहिलीच घटना आहे. अटक नागरिकांमध्ये एका महिलेसह दोन पुरुष आणि अठरा तृतीतपंथींचा समावेश आहे. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच या सर्वांना बांगलादेशात पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन उगले यांनी सांगितले.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई तसेच इतर शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केली होती. संबंधित बांगलादेशी विविध शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास होते. या घुसखोरी केलेल्या बांगलादेशी नागरिकांची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस तसेच आय शाखेला कारवाई आदेश दिले होते. या आदेशानंतर प्रत्येक पोलीस ठाण्यांनी अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना गेल्या आठवड्याभरात वर्सोवा पोलिसांनी अंधेरी येथून 21 हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यात एका महिलेसह दोन पुरुष आणि अठरा तृतीयपंथींचा समावेश आहे.

त्यातील एका कारवाईत अंधेरीतील वर्सोवा परिसरातील दर्ग्याजवळ आलेल्या तेराजणांना एकाच वेळीच ताब्यात घेण्यात आले होते. या बांगलादेशी नागरिकांची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा आव्हाड-वारे , पोलीस निरीक्षक प्राजक्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन उगले, मुकेश पाटील, प्रशांत कांबळे, पोलीस हवालदार पवार, पांडुरंग पवार, खोंडगे, पोलीस शिपाई जगदाळे, नसरुद्दीन इनामदार, निलेश किंजळकर, परदेशी, ठाकरे, महिला पोलीस शिपाई पूनम भामरे यांनी ही कारवाई केली होती.

अटक बांगलादेशी नागरिकांमध्ये मिशॉन चंद्रकोच डिओ सुनिलचंद्र कोच, अस्लम सलाम मुल्ला, सोहेल अब्दुल सरदार, हव्या अक्रम आकुनजी खातून, इस्माईल मुजावर रेहमान, रिना बेगम डिओ आश्रफअली, मोशा शुबी अख्तर डिओ मोहम्मद शाहिदुल इस्लाम, सादिया अख्तर मिमडिओ मोहम्मद हवलदार, मिजानूर रेहमान डिओ सादिक फकीर, मोहम्मद हमीदुल इस्लाम डिओ मोहम्मद रज्जाक सरदार, मोसा दिघी अख्तर डिओ अब्दुल हक, मोहम्मद हसीबुल मंडल डिओ कादसर शेख, मोहम्मद सिहाब हुसैन डिओ मोहम्मद आदुल अली, रुबेलमियाँ डिओ मोहम्मद युसूफअली, मोसा सोनाली डिओ मोहम्मद मुबारक, मोहम्मद रातुल शेख डिओ मोहम्मद अब्दुल कादिर शेख, मोहम्मद मासुम हुसैन डिओ सोबुल्ला, शोहाग डिओ रफिक उल्ला यांचा समावेश आहे.

तपासात ते सर्वजण गेल्या एक ते पाच वर्षांपासून मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात अनधिकृतपणे वास्तव्यास होते. बांगलादेशातील उपासमारी आणि बेरोजगारीला कंटाळून ते भारतात नोकरीसाठी आले होते. अटकेनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्या आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page