मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना किल्ला कोर्टाने दोषी ठरवून दोन महिने तेरा दिवस कारावासासह एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन दोन दिवस कारावासाच शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेनंतर या दोघांनाही त्यांच्या मायदेशात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी अंधेरी परिसरात आलेल्या दोन बांगलादेशी तृतीयपंथीना पोलिसांनी अटक केली होती. तपासात ते दोघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले होते. बांगलादेशातील गरीबीसह उपासमारीला कंटाळून ते दोघेही मुंबई शहरात नोकरीसाठी आले होते. मात्र त्याच्या वास्तव्याची टिप मिळताच अंधेरी पोलिसांच्या एटीएस पथकाने या दोन्ही तृतीयपंथी बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. या दोघांविरुद्ध किल्ला कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के. एस. झंवर यांनी त्यांना दोषी ठरवून दोन महिने तेरा दिवसाचा कारावास, एक हजार रुपयांचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन दोन दिवस कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच शिक्षा संपल्यांतर त्यांना त्यांच्या देशात पाठविण्याचे आदेश अंधेरी पोलिसांना दिले आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद मगर, पोलीस हवालदार कृष्णा गांगुर्डे, सचिन भोसले, सचिन उत्तेकर, रविंद्र गावकर आणि पोलीस शिपाई भीमाशंकर पगारे यांनी केली.