मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांना वेगवेळ्या ठिकाणाहून स्थानिक पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली. अटक आरोपींमध्ये एका महिलेसह मौलानाचा समावेश यातील बहुतांश नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रुबीना अबूहसन शेख, मोहम्मद बिलप मोहम्मद सहाबुद्दीन शेख, मोहम्मद मसुद मतीन रेहमान राणा, मोहीन हयात बादशाह शेख, युनूस आक्काश शेख आणि ताहीर गफुर शेख अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मानखुर्द परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची मानखुर्द पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक महेश सुर्वे, पोलीस हवालदार दिवटे, पोलीस शिपाई भिसे, गणेश नाळे यांनी जनतानगर, नूरी मशिदीजवळ साध्या वेशात पाळत ठेवून रुबीना या ३५ वर्षांच्या महिलेस ताब्यात घेतले. चौकशीत ती बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. गेल्या २४ वर्षांपासून ती भारतात वास्तव्यास होता. घरकाम करुन ती स्वतचा उदरनिर्वाह चालवत होती. मानखुर्द येथील अन्य एका कारवाईत ट्रॉम्बे पोलिसांनी ताहीर शेख या बांगलादेशी नागरिकाला अटक केली. तो महाराष्ट्रनगरात राहत होता. २० वर्षांपूर्वी तो बांगलादेशातून भारतात आला होता. तेव्हापासून तो मानखुर्द येथे वास्तव्यास होता. ही माहिती मिळताच एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील लोंढे, पोलीस हवालदार आखाडे, सकट, महिला पोलीस शिपाई सोनवने, पोलीस शिपाई गोविंद बाड यांनी त्याला आंबेडकर मैदान परिसरातून अटक केली.
दुसर्या कारवाईत कफ परेड पोलिसांनी मोही हयात शेख याला ताब्यात घेतले. मोहीन हा कफ परेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, विठ्ठलवाडी परिसरात राहत होता. तिथे तो मौलाना म्हणून काम करत होता. १९९० साली तो भारतात आला होता. परळ, मुंब्रा, घाटकोपर येथे राहिल्यानंतर तो गेल्या काही वर्षांपासून कफ परेड परिसरात वास्तव्यास होता. यादरम्यान त्याने भारतीय नागरिक असल्याने काही दस्तावेज बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अन्य तीन कारवाईत अंधेरीतील जुहू गल्ली, सलामिया हॉटेल येथून मोहम्मद बिलप, गोरेगाव फिल्मसिटी रोड, संतोषनगर परिसरातून मोहम्मद मसुद, जोगेश्वतील लोटस पेट्रोलपंप परिसरातून युनूस शेख या तिघांना स्थानिक पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली. यातील मोहम्मद बिलप हा प्लंबर असून तो तीन महिन्यांपूर्वी बांगलादेशातून भारतात आला होता. तेव्हापासून तो वसई येथे वास्तव्यास होता. सध्या तो वसईतील कोळीवाडा, साईदत्त नगरात राहत होता. अन्य एक नागरिक युनूस हा हादेखील वसईतील कोळीवाड्यातील रहिवाशी आहे. बांगलादेशात वास्तव्यास असताना त्याच्यावर कर्ज झाले होते. कर्ज फेडण्यासाठी त्याला पैशांची गरज होती.
बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीमुळे त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो नोकरीसाठी भारतात पळून आला होता. गेल्या एक वर्षांपासून तो वसई परिसरात वास्तव्यास होता. तीन दिवसांपूर्वी तो कामासाठी जोगेश्वरी येथे आला असता त्याला पोलिसांनी अटक केली. या सहाजणांकडून पोलिसांनी सहा मोबाईल जप्त केले आहे. या मोबाईलची पाहणी केल्यानंतर ते सर्वजण त्यांच्या बांगलादेशातील कुटुंबासह नातेवाईक आणि मित्रांच्या नियमित संपर्कात असल्याचे उघडकीस आले.
बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून ते मुंबईसह आसपासच्या परिसरात राहत होते. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना पुन्हा बांगलादेशात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.