मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ जानेवारी २०२५
मुंबई, – भांडुपच्या ड्रिम मॉलजवळील बेसमेंटमधील पाण्यात एका ४० वर्षांच्या महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव मनिषा अशोक गायकवाड ऊर्फ मनिषा मंगेश भिसे (४०) असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी एडीआरची नोंद करुन मनिषाच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीचा तपशील समजू शकला नाही.
मनिषा ही भांडुप येथील एलबीएस मार्ग, काका पेट्रोलपंप, जेकेडब्ल्यू फुटपाथवर राहत होती. तिचा मृतदेह मंगळवारी सकाळी ड्रिम मॉलच्या बेसमेंटमधील पाण्यात तरंगत असल्याचे एका व्यक्तीच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने ती माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला दिली. ही माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या महिलेला पोलिसांनी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या महिलेचा फोटो परिसरात अनेकांना दाखविण्यात आला होता. यावेळी काही लोकांनी मृत महिलेचे नाव मनिषा गायकवाड ऊर्फ मनिषा भिसे असल्याचे सांगून ती जेकेडब्ल्यू फुटपाथवर राहत असल्याचे सांगितले. तपासात तिचा एक प्रियकर असून त्याला भेटण्यासाठी ती सोमवारी बाहेर गेलीहोती. त्यानंतर ती परत आली नाही. सकाळी तिचा मृतदेह बेसमेंटमधील पाण्यात सापडला.
तपासात आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पोलिसांकडून तपास सुरु आहे. या फुटेजवरुन मनिषा ही एका वाईन शॉपमध्ये गेली होती. तेथून ती ड्रिम मॉलजवळ आली होती. मद्यप्राशन करुन ती पाण्यात पडली आणि त्यात तिचा बुडून मृत्यू झाला आहे का याचाही पोलीवस तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतिक्षा असून या अहवालानंतर तिच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी एडीआरची नोंद करुन पोलीस तपास करत आहेत.