पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलीची अपहरण करुन विनयभंग
मासिक पाळी असल्याने मुलीची सुटका करुन तिघांचे पलायन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शाळेत जाण्यासाठी घरातून निघालेल्या एका पंधरा वर्षांच्या शाळकरी मुलीचे लैगिंक अत्याचार करण्याच्या उद्देशाने भरस्त्यात तीनजणांच्या एका टोळीने रिक्षातून अपहरण करुन तिला एका फ्लॅटमध्ये आणले. मात्र मासिक पाळी सुरु असल्याचे लक्षात येताच या तिघांनी तिला भांडुप रेल्वे स्थानकात सोडून पलायन केले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन तिन्ही आरोपीविरुद्ध भांडुप पोलिसांनी अपहरणासह विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून त्यासाठी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४० वर्षांी तक्रारदार महिला भांडुप येथे राहत असून बळीत तिची पंधरा वर्षांची मुलगी आहे. याच परिसरातील एका खाजगी शाळेत ती दहावीत शिकते. शुक्रवारी पावणेसात वाजता ती नेहमीप्रमाणे घरातून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. हनुमाननगर, दिपक स्टोअरजवळ येताच तीन अज्ञात व्यक्तीने तिला रिक्षात बसवून तिचे अपहरण केले होते. त्यानंतर ते तिघेही तिला घेऊन एका फ्लॅटमध्ये घेऊन आले होते. तिथेच त्यांनी तिचे कपडे काढून तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिला मासिक पाळी सुरु असल्याने त्यांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केले नाही. तिला पुन्हा रिक्षातून भांडुप स्टेशनला सोडून ते तिघेही पळून गेले होते. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. ही माहिती ऐकल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्या दोघीही भांडुप पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तिन्ही आरोपीविरुद्ध अपहरणासह विनयभंग, पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन रिक्षाचा क्रमांकासह आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.