मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ डिसेंबर २०२४
मुंबई, – भांडुप येथील इंटरनॅशनल शाळेत तीन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणी लिफ्ट मॅकेनिक असलेल्या एका आरोपीला भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. यासाठी शिवसेनेच्यावतिने भांडुप पोलिसांना निवेदन देऊन काही सुचना करण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख रमेश कोरगावकर व युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील उपस्थित होते.
भांडुप मधील तीन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणी शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय खंडागळे यांची भेट घेतली. या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली त्याची माहिती घेऊन मुलींच्या सुरेक्षेबाबत काही सुचना केल्या. विद्यालय तसेच महाविद्यालयात असलेल्या सर्व सीसीटीव्ही कार्यक्षम आहेत का याची पाहणी करुन सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी. सर्व शाळेच्या बसेस मध्ये सीसीटीव्ही लावण्यात यावे तसेच बसेस मध्ये महिला कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात यावी. शैक्षणिक क्षेत्रात काम करणा-या सर्व कर्मचा-यांचे चरित्र पडताळणी करण्यात यावी. या सारख्या सुचना शाळांना करण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतिने एक निवेदन पोलिसांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख रमेश कोरगावकर व युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिसांनीही खबरदारी म्हणुन सर्व शाळांना सुचना केल्या असून शाळा परिसरात सीसीटीव्ही लावावेत. शाळेतील कोणत्याही प्रकारची कामे करायची असल्यास सुट्टीच्या कालावधीत ती करण्यात यावी. बाहेरुन येणा-या व्यक्तींची वेगळ्या रजिस्टर मध्ये नोंद करण्यात यावी. त्या व्यक्ती बरोबर एका सुरक्षारक्षकाची नेमणुक करण्यात यावी.