मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मार्च 2025
मुंबई, – भांडुप परिसरातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा भांडुप पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी स्वरा नावाच्या एका डेकोरेशन व्यावसायिक महिलेस भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली असून मेडीकलनंतर या दोन्ही तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
स्वरा ही महिला भांडुप येथील एका निवासी अपार्टमेंटमध्ये राहते. तिचा डेकोरेशनचा व्यवसाय असून या व्यवसायासह ती काही तरुणींच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत होती. गरीब तरुणींच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन ती ग्राहकांसोबत तरुणींना शरीरसंबंधासाठी पाठवत होती. ही माहिती प्राप्त होताच भांडुप पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याची शहानिशा सुरु केली होती. तिला संपर्क साधून तिच्याकडे काही तरुणींची मागणी करण्यात आली होती. फोनवरुन सर्व आर्थिक व्यवहार झाल्यानंतर तिने बोगस ग्राहकाला तिच्या राहत्या घरी बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे हा बोगस ग्राहक तिच्या घरी गेला होता. यावेळी त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरु असताना भांडुप पोलिसांनी तिथे छापा टाकून फ्लॅटमध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता.
याच गुन्ह्यांत नंतर स्वरा या महिलेस पोलिसांनी अटक केली. यावेळी फ्लॅटमधून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. त्यांच्या चौकशीतून स्वरा ही ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना त्यांच्यासोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत होती. ग्राहकांकडून मिळणार्या रक्कमेतून काही रक्कम त्यांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम ती स्वतकडे ठेवत होती. या घटनेनंतर तिच्याविरुदध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. दोन्ही तरुणींची सुटका केल्यानंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.