भांडुप येथे 23 वर्षांच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 जुलै 2025
मुंबई, – भांडुप येथे राहणार्‍या शिवम विनोद तिवारी या 23 वर्षांच्या तरुणाने त्याच्या राहत्या घरी लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध भांडुप पोलिसांनी शिवमचा मानसिक शोषण करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोनू यादव, चेतन गौतम, अनिकेत घाडी, गौतम ढेकळे, ओमकार मोरे आणि धनराज ऊर्फ गणेश निकाळजे अशी या सहाजणांची नावे आहेत. या सर्व आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. आर्थिक वादातून या आरोपींकडून शिवमचा मानसिक शोषण सुरु असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सत्यम विनोद तिवारी हा तरुण भांडुपच खिंडीपाडा, शांतीनिकेतन अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याचे वडिल एका खाजगी कंपनी एरिया मॅनेजर तर काका खाजगी कंपनीत कामाला आहे. मोठा भाऊ शिवम हा गेल्या दोन वर्षांपासून मुलुंडच्या अ‍ॅमेझॉन कंपनीत डिलीव्हरी बॉयचे काम करत होता. एक महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी सोनू यादव आणि चेतन गौतम आले होते. ते दोघेही शिवमशी कुठल्या तरी विषयावर वाद घालत होते. यावेळी सत्यमने बाहेर जाऊन पाहिले असता ते दोघेही दारुच्या नशेत त्याच्या भावाशी वाद घालून त्याला शिवीगाळ करत असल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी शिवमने डिलीव्हरी केलेल्या मालाचे 75 हजार रुपये दिले नाही. त्याच्या वसुलीसाठी तिथे आल्याचे सांगितले. ही रक्कम शिवमने दिली नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन ते दोघेही तेथून निघून गेले होते.

या घटनेनंतर शिवम हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होता. चौकशीनंतर अ‍ॅमेझॉन कंपनीत डिलीव्हरी न झाललेे इतरांचे पार्सल हे त्याच्या आयडीवरुन सोनू आणि चेतन जबदस्तीने रिजेक्ट मारण्यास सांगून त्याला अधूनमधून कंपनीतून ब्लॉक केले जात होते. या दोघांकडून त्याचा सतत मानसिक शोषण सुरु आहे. डिलीव्हरीचे पैसे कंपनीत जमा न करता शिवम घरी घेऊन जातो असे सांगून त्याला पैसे भरण्यास सांगत होते. याच दरम्यान शिवमने त्याचा मित्र ओमकारकडून तीस हजार रुपये उसने घेतले होते. मात्र त्याला ती रक्कम देता येत नव्ही. त्यामुळे ओमकार त्याला पैशांसाठी सतत मॅसेज करुन शिवीगाळ करत होता. या दोन्ही घटनेने तो कंटाळून गेला होता. स्वतच्या जिवाचे बरेवाईट करण्याचे सांगत होता. यावेळी सत्यमला त्याला धीर देत त्यातून मार्ग काढण्याचा सल्ला दिला होता. 2 जुलैला सायंकाळी सहा वाजता शिवम कामावर घरी आला होता. यावेळी तो प्रचंड मानसिक तणावात होता.

रात्री नऊ वाजता त्याला त्याच्या परिचित अनिकेत, गणेश आणि गौतम दिसले. या तिघांनी शिवमबाबत विचारणा केली. यावेळी सत्यमने त्यांच्याकडे शिवमकडे काय काम आहे याबाबत विचारले असता त्यांनी अनिकेतला जिवे मारण्यासाठी पाठविल्याचे सांगितले. शिवमने ओमकारकडून तीस हजार रुपये घेतले असून तो पैसे परत करत नाही. त्यामुळे त्याचा आज हिशोब पूर्ण करणार अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर सत्यम हा घरी गेला होता. यावेळी त्याला शिवमने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्याने छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला तातडीने जवळच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी सत्यम तिवारीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोनू यादव, चेतन गौतम, अनिकेत घाडी, गौतम ढेकळे, ओमकार मोरे आणि धनराज ऊर्फ गणेश निकाळजे यांच्याविरुद्ध पोलिसांनी शिवमचा मानसिक शोषण करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या सर्व आरोपींना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page