गांजा तस्करीप्रकरणी तीन आरोपींना अटक

37 लाखांचा 74 किलो गांजाचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जुलै 2025
ठाणे, गांजा तस्करीप्रकरणी एका टोळीचा ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. फैजल अकबर अन्सारी, अब्दुल रेहमान मुजाहिद अन्सारी आणि अन्वर जमीलुद्दीन अन्सारी अशी या तिघांची नावे असून त्यांच्याकडू पोलिसांनी 74 किलो 548 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत 37 लाख 37 हजार 400 रुपये इतकी आहेत. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अब्दुल अन्सारी हा गांजा तस्करीच्या गुन्ह्यांतील एक मुख्य आरोपी असून तो त्याच्या सहकार्‍यासोबत भिवंडी परिसरात गांजाची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, धनराज केदार, रविंद्र पाटील, सहाय्यक फौजदार सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार सुदेश घाग, प्रकाश पाटील, राजेश गावडे, निलेश बोरसे, महिला पोलीस हवालदार अनुष्का पाटील, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, रविंद्र साळुंखे यांनी भिवंडीतील मोमीनबाग, दर्गा रोडवर साध्या वेशात पाळत ठेवून फैजल अन्सारी, अब्दुल अन्सारी आणि अन्वर अन्सारी या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीदरम्यान अब्दुलने त्याच्या घरी गांजाचा साठा ठेवल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्या घरी छापा टाकून पोलिसांनी तेथून 37 लाखांचा 74 किलो गांजाचा साठा जप्त केला. याच गुन्ह्यांत नंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. सध्या ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी हा साठा कोठून आणला आणि ते कोणाला विकणार होते याचा पोलीस तपास करत आहेत.

मालवणीतून सहा किलो गांजासह आंतरराज्य तस्करास अटक
अन्य एका कारवाईत मालवणी पोलिसांनी सहा किलो गांजासह एका आंतरराज्य तस्कराला अटक केली. परवेज अहमद अमीरुद्दीन सय्यद असे या 46 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी दिड लाखांचा 6 किलो 398 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मालाडच्या मालवणी, जनकल्याण रोड, मंगल दर्शन इमारतीसमोर मालवणी पोलिसांचे एक विशेष पथक गस्त घालत होते. यावेळी तिथे संशयास्पद फिरणार्‍या परवेज सय्यदला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना सहा किलो गांजा सापडला. त्याची किंमत सुमारे दिड लाख रुपये आहे. परवेज हा मूळचा बिहारख्या भोजपूर, संदेशचा रहिवाशी असून कापड व्यापारी आहेत. जप्त केलेला गांजा त्याने आंधप्रदेशच्या विशाखापट्टणम येथून आणला होता. तो आंतरराज्य गांजा तस्कर असून मालवणी परिसरात तो गांजाची डिलीव्हरीसाठी आला होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे, पोलीस हवालदार अनिल पाटील, जगदीश घोसाळकर, पोलीस शिपाई सुशांत पाटील, सचिन वळतकर, मुद्दसीर देसाई, समीत सोरटे, कालिदास खुडे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page