मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बदलापूर येथील एका शाळेत अल्पयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना परळच्या एका खाजगी शाळेत एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीचा शाळेच्याच शिपायाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच ५६ वर्षांच्या आरोपी शिपायाला भोईवाडा अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
३८ वर्षांची तक्रारदार महिला दादर परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. बळीत तिची चौदा वर्षांची मुलगी असून ती लहानपणापासून दिव्यांग आहे. ती परळच्या एका दिव्यांगासाठी असलेल्या शाळेत शिकते. १ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत शाळेत असताना वर्गात आरोपी शिपायाने तिच्या छातीला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. तसेच प्रायव्हेट पार्टला चिमटा काढला होता. अलीकडेच तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला होता. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने भोईवाडा पोलीस ठाण्यात आरोपी शिपायाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ५६ वर्षांच्या शिपायाला पोलिसांनी अटक केली. आरोपी हा मिरारोडच्या मिरा-भाईंदर रोडचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.