बॉलीवूडनंतर आता भोजपुरी अभिनेता बिष्णेाई टोळीच्या रडारवर
अभिनेता पवन सिंग यांच्यासह मॅनेजरला आलेल्या धमकीने खळबळ
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 डिसेंबर 2025
मुंबई, – बॉलीवूडनंतर आता भोजुरी अभिनेता बिष्णोई टोळीच्या रडारवर असल्याचे उघडकीस आले आहे. भोजपुरी अभिनेता पवन सिंग याच्यासह त्याच्या मॅनेजरला बिष्णोई टोळीकडून सलग दोन दिवसांपासून जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. दबंग अभिनेता सलमान खानसोबत स्टेज शेअर करु नकोस, नाहीतर तुझाही पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला होईल अशी धमकीच अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे. या धमकीनंतर सोमवारी मॅनेजरला ओशिवरा पोलिसांना ही माहिती सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लेखी अर्जाद्वारे तक्रार केली आहे. दरम्यान या तक्रार अर्जाची पोलिसांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरु केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. बॉलीवूडनंतर आता भोजपुरी अभिनेत्याला बिष्णोई टोळीकडून धमकी आल्याने भोजपुरी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार भोजपुरी अभिनेता पवन सिंग याचा मॅनेजर आहे. पवन हा सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसमध्ये सामिल झाला होता. तो बिग बॉसचा एक स्पर्धेक होता. शनिवारी रात्री दहा वाजता त्याला एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने तो लॉरेन्स बिष्णोई असल्याचा दावा करुन त्याला धमकीवजा इशारा दिला होता. पवन सिंगला सांग बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्यासोबत स्टेज शेअर करु नकोस. नाहीतर त्याचाही सिद्धू मुसेवाला होईल अशी धमकी दिली होती. तरीही त्याने सलमानसोबत काम केल्यास त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे सांगितले.
या कॉलनंतर त्यांना त्याच मोबाईलवरुन व्हॉटवर धमकीचे मॅसेज येऊ लागले. सुरुवातीला त्यांना एकाच मोबाईल क्रमांकावरुन धमकी दिली जात होती, मात्र नंतर त्यांना वेगवेगळ्या धमकी मिळू लागली. तक्रारदार मॅनेजरसह त्यांच्या टिमच्या एका सदस्याला अशाच प्रकारे बिष्णोई टोळीकडून धमकी आली होती. या सदस्याला संबंधित व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडे खंडणीची मागणी केली होती.
दुसर्या दिवशी तक्रारदार मॅनेजरला पुन्हा एका व्यक्तीने कॉल करुन त्याला सोशल मिडीयावर चुकीचा मॅसेज देणे बंद कर. मी तुझ्याकडे खंडणीची मागणी केली नाही. फक्त पवनने सलमानसोबत स्टेज शेअर करु नये हीच माझी इच्छा आहे. तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती.
या घटनेनंतर त्यांनी सोमवारी सकाळी ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून लॉरेन्स बिष्णोईसह इतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीनंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणर आहे.
लॉरेन्स बिष्णोई हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या तो गुजरातच्या साबरमती जेलमध्ये आहे. 1998 साली शिकार प्रकरणानंतर बिष्णोई टोळीकडून सलमान खानला सतत टार्गेट करुन जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. त्याच्यासह त्याच्या वडिलांनी बिष्णोई टोळीने धमकी दिली आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर बिष्णोई टोळीकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाला नव्हता.
या गोळीबारानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची वांद्रे येथे बिष्णोई टोळीकडून हत्या झाली होती. या घटनेनंतर बॉलीवूडमध्ये बिष्णोई टोळीची प्रचंड दशहत निर्माण झाली होती. आता बिष्णोई टोळीकडून भोजपुरी अभिनेता पवन सिंगला धमकी आली आहे. त्यामुळे भोजपुरी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.