बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड गुन्हेगारांना अटक
पाच गुन्ह्यांची उकल करुन सहा चोरीचे बाईक जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 जुलै 2025
मुंबई, – बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील दोन वॉण्टेड गुन्हेगारांना अटक करण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आले आहे. या दोघांच्या अटकेने पाच गुन्ह्यांची उकल करुन सहा चोरीचे बाईक हस्तगत करण्यात आले आहे. अटक आरोपींमध्ये मोहम्मद शाद मोहम्मद शफी कुरेशी अणि मोहम्मद अकबर मुनीर खान यांचा समावेश आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
यातील तक्रारदार आग्रीपाडा परिसरात राहतात. 11 जुलैला रात्री साडेअकरा वाजता त्यांनी त्यांची बाईक डॉ. आनंदराव नायर मार्ग, जनरल मेडीकल समोरील आरटीओ कॉलनीसमोर पार्क केली होती. ही बाईक अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार दुसर्या दिवशी उघडकीस आल्यानंतर त्यांनी आग्रीपाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बाईक चोरीचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिीसांनी मोहम्मद शाद कुरेशी आणि मोहम्मद अकबर खान या दोघांना ताब्यात घेतले होते.
चौकशीत ते दोघेही सराईत बाईक चोर असल्याचे उघडकीस आले. त्यांनीच तक्रारदारांची बाईक चोरी केली होती. त्यांच्या अटकेने बाईक चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. त्यात नागपाडा दोन, आग्रीपाडा, माहीम आणि मुंब्रा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा समावेश आहे. याच गुन्ह्यांतील सहा चोरीचे बाईक पोलिसांनी जप्त केले आहेत. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.