हिर्यांच्या चोरीप्रकरणी कंपनीच्या वॉण्टेड कर्मचार्याला अटक
99 लाखांच्या हिर्यांचा अपहाराचा गुन्हा असल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2025
मुंबई, – हिर्यांचे पॅकिंग करताना सुमारे बारा लाखांच्या हिर्यांच्या चोरीनंतर पळून गेलेल्या कंपनीच्या एका वॉण्टेड कर्मचार्याला सहा महिन्यानंतर अटक करण्यात बीकेसी पोलिसांना यश आले आहे. सावन भुपतभाई इटालिया असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांत चोरीसह 99 लाखांच्या हिर्यांचा अपहारासह फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीच्या याच गुन्ह्यांत नंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
राजेशकुमार तुलसीभाई धामेलिया हे विलेपार्ले येथे राहत असून व्यवसायाने हिरे व्यापारी आहेत. तयांची सिंगल कट डायमंड नावाची एक कंपनी असून या कंपनीचे एक कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये आहेत. याच कार्यालयातून त्यांचे हिर्यांचे खरेदी-विक्रीचा व्यवहार चालतो. ते हिरे व्यापार्यासह दलालांना झांगड पावतीवर क्रेडिटवर हिरे विक्रीसाठी देतात. त्यांच्याच कंपनीत सावन इटालिया हा कामाला होता. 3 डिसेंबर 2024 रोजी त्याने मुंबईसह दिल्लीतील विशाल चैन कंपनी आणि जयपूर येथील काही राजपूत्रांना, राणीवाला कंपनीसाठी त्याच्या कार्यालयातून 99 लाख 85 हजार रुपयांचे 665 कॅरेटचे हिरे घेतले होते.
मात्र या हिर्यांची संबंधित हिरे व्यापार्यासह जयपूर येथील राजपूत्रांना डिलीव्हरी न करता त्याने हिर्यांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार नंतर उघडकीस येताच राजेशकुमार धामेलिया यांनी सावन इटालिया याच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हिर्यांचा अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच राजेशकुमार धामेलिया यांनी त्यांच्या कार्यालयातील हिर्यांच्या खरेदी-विक्रीच्या रजिस्ट्रेशनची पाहणी केली होती. त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात फरक दिसून आला होता. त्यामुळे त्यांनी कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात 23 ऑक्टोंबर 2024 रोजी दुपारी पावणेचार वाजता सावन इटालिया हा हिर्यांचे पॅकेट पॅकिंग करताना काही हिरे स्वतच्या पॅण्टच्या खिशात लपवत असल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान त्याने पॅकिंगदरम्यान 12 लाख 17 हजार रुपयांचे 101 कॅरेटचे हिरे चोरी केल्याचे उघडकीस आले होते.
हा प्रकार उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध राजेश धामेलिया यांनी पुन्हा बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बीकेसी पोलिसांनी सावन इटालियाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तो गेल्या सहा महिन्यांपासून वॉण्टेड होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना सावन इटालिया याला बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला बारा लाखांच्या हिर्यांच्या चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.