चलन एक्सचेंजच्या नावाने गंडा घालणार्या दुकलीस अटक
बारा हजार अमेरिकन-चार हजार ब्रिटन पौंड घेऊन पलायन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – विदेशी चलन एक्सचेंजच्या नावाने बारा हजार अमेरिकन व चार हजार ब्रिटन पौंड असे सुमारे पंधरा लाखांचे विदेशी चलन घेऊन पळून गेलेल्या दुकलीस अखेर बीकेसी पोलिसांनी अटक केली. गुरुकुमार उपेंद्र सहानी आणि मृत्यूजंय विजयकुमार गर्ग अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच ते दोघेही एक महिन्यांपासून फरार होते, अखेर या दोघांनाही गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
गंगासिंह राजूसिंह परमार हा मूळचा राजस्थानचा रहिवाशी असून तो त्याच्या मित्रासोबत अंधेरीतील चकाला परिसरात राहतो. या दोघांचा विदेशी चलन ए३सचेंजचा व्यवसाय आहे. ३ जुलैला त्याला गौरव साहू नाव सांगणार्या इसमाचा फोन आला होता.त्याने तो करन्सी ए३सचेंज कंपनीचा एजट असून त्याला बारा हजार डॉलर आणि चार हजार पौंड पाहिजे आहे. त्याची त्याला तो चांगली किंमत देईल असे सांगून हा व्यवहार वांद्रे येथील बीकेसी येथे होईल सांगितले. त्यामुळे गंगासिंह हा विदेशी चलन घेऊन बीकेसी येथील जी ब्लॉक, इनस्पायर परिसरात गेला होता. यावेळी त्याला गौरव साहू भेटला, त्याच्यासोबत अन्य एक तरुण होता. त्याने त्याचा तिथेच एक कार्यालय असल्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने त्याच्याकडून १५ लाख बारा हजार रुपयांचे विदेशी चलन घेतले. यावेळी त्याने गंगासिंहला पेपरची नीट पाहणी करुन घ्या, तोपयरत बॉसला विदेशी चलन दाखवून आणतो असे सांगितले. काही वेळानंतर गौरव साहू तेथून निघून गेला आणि परत आला नाही. बराच वेळ वाट पाहून त्याने त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल बंद होता. संबंधित कार्यालयाची चौकशी केली असता कार्यालयाच्या मॅनेजरने त्याच्याकडे दोन व्येी ंनी दोन तासांसाठी कार्यालय भाड्याने घेतल्याचे सांगितले.
या दोघांनी विदेशी चलन ए३सचेंजच्या नावाने फसवणुक केल्याचे लक्षात येताच गंगासिंह परमारने घडलेला प्रकार बीकेसी पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना एक महिन्यांपासून फरार असलेल्या गुरुकुमार सहानी आणि मृत्यूजंय गर्ग या दोन्ही भामट्यांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळ कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.