मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2025
मुंबई, – ब्लॅकमेल करुन एका व्यावसायिकाला पंधरा लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी एका पती-पत्नीसह तिघांविरुद्ध कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोशनी यादव, लक्ष्मी पांडे आणि शुभम यादव अशी या तिघांची नावे आहेत. अशा प्रकारे ब्लॅकमेल करुन खंडणी वसुली करणारी ही सराईत टोळी असून या टोळीविरुद्ध यापूर्वीही अशाच काही गुन्ह्यांची नोंद झाल्याचे बोलले जाते. या तिघांची चौकशी करुन त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
39 वर्षांचे तक्रारदार मालाड येथे राहत असून त्यांचा इमिटेशनचा व्यवसाय आहे. कुरार व्हिलेज, आप्पापाडा परिसरात त्यांच्या मालकीचे इमिटेशनचा एक कारखाना आहे. त्यांच्या कारखान्यात अनेक महिला कामासाठी येतात. तिथेच त्यांची रोशन यादवशी ओळख झाली होती. त्यांच्याकडून रोशनी ही कच्चा माल घेऊन तंना पक्का माल बनवून देत होती. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध र्मिाण झाले होते. काही दिवसांनी त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांच्यात दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध आले होते. डिसेंबर 2024 रोजी रोशनीने शुभम यादवशी लग्न केे होते.
14 जानेवारीला तिने तक्रारदारांना कॉल करुन ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या असता तिने ती त्यांच्यापासून गरोदर राहिल्याचे सांगितले. त्यानंतर तिने त्यांच्याकडून पंधरा लाखांची ामगणी करुन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तिला पैसे दिले नाहीतर त्यांच्याविरुद्ध लैगिंक अत्याचाराची खोटी तक्रार करण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर ते प्रचंड घाबरले होते. त्यानंतर रोशनी सतत कॉल करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होती.
काही दिवसांपूर्वी ती त्यांना भेटण्यासाठी आली होती. यावेळी तिच्यासोबत लक्ष्मी पांडे ही महिला होती. या दोघांनी त्यांना ती त्यांच्यामुळे गरोदर राहिली आहे, त्यामुळे प्रकरण मिटविण्यासाठी त्यांना पंधरा लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर परिणामाला सामोरे जावा अशी धमकी दिली होती. त्यानंतर रोशनीचा पती शुभम यानेही त्यांना साडेतीन लाखांच्या खंडणीसाठी धमकी देण्यास सुरुवात केली होती. या तिघांकडून होणार्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. 25 जानेवारीला कुरार पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. तपासात या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले होते. याबाबत काहींनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर रोशनी यादव, लक्ष्मी पांडे आणि शुभम पांडे या तिघांविरुद्ध पोलिसांनी ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत लवकरच तिघांवर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.