मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 मार्च 2025
मुंबई, – महानगरपालिकेत नोकरीच्या आमिषाने एका तरुणीची सुमारे पावणेसात लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या वॉण्टेड आरोपीस पाच महिन्यानंतर समतानगर पोलिसांनी अटक केली. सिद्धेश जितेंद्र फारणे असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नोकरीसाठी पैसे घेऊन सिद्धेशने दोन वर्षांत नोकरी न देता तिला नवी दिल्लीतील दुसर्या खात्याचे बोगस दस्तावेज देऊन तिची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पूजा यशवंत गव्हाणे ही तरुणी कांदिवलीतील अशोकनगर, बागडोंगरी परिसरात राहत असून ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ती तिच्या एका मैत्रिणीसोबत बोरिवली येथे एकत्र काम करत होते. तीन वर्षांपूर्वी त्या दोघीही नवीन नोकरीच्या शोधात होते. यावेळी तिच्या एका मैत्रिणीने तिला सिद्धेश फारणेची शिफारस केली होती. सिद्धेशची महानगरपालिकेत चांगली ओळखी आहेत. त्याचे मनपाच्या काही अधिकार्यांशी चांगले संबंध आहे. त्यामुळे तो तिला हमखास मनपामध्ये नोकरी मिळवून देईल असे सांगितले होते. त्यामुळे तिने त्याला कॉल करुन कांदिवली येथे नोकरीनिमित्त बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे 11 ऑगस्ट 2022 रोजी या दोघांची भेट झाली होती. यावेळी तिने मनपामध्ये नोकरीविषयी सविस्तर चर्चा करुन त्याला तिचे शैक्षणिक कागदपत्रे दिले होते. यावेळी सिद्धेशने तिला शक्य तितक्या लवकरच तिचे मनपामध्ये काम करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी तिला किमान सात ते आठ लाख रुपये खर्च येईल तसेच तिची ऑर्डर काढण्यासाठी आगाऊ काही रक्कम द्यावे लागतील असे सांगितले होते.
मनपामध्ये नोकरी मिळत असल्याने तिने त्यास होकार दिला होता. ठरल्याप्रमाणे तिने त्याला टप्याटप्याने डिसेंबर 2022 ते मार्च 2024 या कालावधीत पावणेसात लाख रुपये घेतले होते. त्यापैकी दोन लाख रुपये कॅश तर उर्वरित रक्कम त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. मात्र दोन वर्ष उलटूनही त्याने तिला नोकरी मिळवून दिली नाही. तो सतत विविध कारण सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान त्याने तिला नवी दिल्लीतील राष्ट्रीय जल विकास प्राधिकरण विभागाचे नियुक्तीपत्र दाखविले होते. ते नियुक्तीपत्र तिने मनपा कार्यालयात दाखविले असता या विभागाचे मनपाशी काहीही संबंध नसल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्याच्याकडून नोकरीबाबत ठोस कारवाई होत नसल्याने तिने निराश होऊ मनपाच्या नोकरीचा विषय सोडून दिला होता. त्यानंतर तिने सिद्धेशकडे नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती.
मात्र त्याने तिला पैसे दिले नाही. उलट तिलाच पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर असे सांगून बघून घेण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर तिने समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. तिच्या तक्रारीनंतर सिद्धेश फारणेविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सिद्धेशला पाच महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्या चौकशीत त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.