ताजसह आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी

अफजल गुरु-सॅवक्कू शंकर यांना फाशी दिल्याचा सूड घेणार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मे 2025
मुंबई, – द ताज महल पॅलेसह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाईप बॉम्बस्फोट घडविण्याची धमकीचा एक मेल विमानतळ पोलिसांच्या अधिकृत ई-मेलवर प्राप्त झाला आहे. अफजल गुरु आणि सॅवक्कू शंकर यांना फाशी दिल्याचा सूड घेणार असल्याची धमकीच या मेलवरुन देण्यात आली आहे. दरम्यान या धमकीची मुंबई पोलिसाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून सर्वच पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. याप्रकरणी विमानतळावर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेसह एटीएस आणि सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

महेश ज्ञानदेव कदम हे अंधेरीतील मरोळ-मरोशी रोड, मरोळ पोलीस कॅम्प वसाहतीत राहत असून सध्या विमानतळ पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्याचा स्वतचा अधिकृत ई-मेल आयडी आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजता या मेलवर विदुथलाई पुली वेलम या मेल आयडीवर एक मॅसेज आला होता. या व्यक्तीने स्वतची ओळख लपवून अफजल गुरु आणि सॅवक्कू शंकर यांना अन्यायकारकरीत्या फाशी दिली आहे. त्यामुळे त्याचा सूड घेणार आहोत असून द ताज महल पॅलेस आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाईप बॉम्बस्फोटद्वारे घातपात घडविण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली होती. हा मॅसेज निदर्शनास येताच ती माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली होती.

या धमकीची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेत सर्वच पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. परिसरात जास्तीत जास्त गस्त, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन करा. संशयित व्यक्तींची चौकशी करा असा आदेश दिले आहेत. दरम्यान या धमकीनंतर विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बॉम्बस्फोटाची धमकी देऊन शहरात अशांतता निर्माण करणे, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा मेल कोणी आणि कोठून पाठविला याचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे.

सायबर सेल पोलिसांच्य मदतीने स्थानिक गुन्हे शाखा आणि एटीएसने स्वतंत्रपणे तपास सुरु केला आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर देशभरात घातपात होण्याची शक्यता लक्षात येताच मुंबई शहरातील बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. बंदोबस्तात अजिबात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही अशी सक्त ताकिद वरिष्ठांकडून स्थानिक पोलिसांना देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page